Pune Crime | सायकलवर फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाचा मोबाईल चोरणारा गुन्हे शाखेकडून गजाआड, iPhone जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पहाटे सायकलवर फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाचा महागडा मोबाईल चोरणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 65 हजार रुपये किमतीचा आयफोन (iPhone) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.20) भवानी पेठेतील विनय हायस्कुल समोर (Pune Crime) करण्यात आली.

 

रूपेश मनोज क्षीरसागर Rupesh Manoj Kshirsagar (वय-24 रा. विनय हायस्कुल समोर, भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) याबाबत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हे 19 जून रोजी पहाटे शिवाजीनगर येथून सायकलवर फिरण्यासाठी सायकलिंग (Cycling) करत हडपसर ब्रीजवरुन सोलापूर रोडच्या दिशेने जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरुन त्यांचा पाठलाग करुन आयफोन चोरुन नेला होता. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पथक फरार आरोपींची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी रुपेश क्षीरसागर हा आयफोन विक्रीसाठी विनय हायस्कूल (Vinay High School Bhawani Peth) समोर उभा आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 65 हजार रुपये किमतीचा आयफोन मिळाला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने एक महिन्यापूर्वी हडपसर ब्रिज येथुन चोरल्याची कबुली दिली. आरोपीला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale),
उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), अजय जाधव (PSI Ajay Jadhav) पोलीस अंमलदार अजय थोरात,
निलेश साबळे, राहुल मखरे, अमोल पवार, इम्रान शेख, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत,
शुभम देसाई, महेश बामगुडे, अय्याज दडडीकर, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | The thief who stole the mobile phone of a citizen who
was going for a bicycle ride was caught by the crime branch, the iPhone was seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा