पुणेकर विद्यार्थ्याची जबरदस्त संकल्पना ! कोरोनाबाबत अद्ययावत माहिती देणाऱ्या ‘जीव रक्षा’ वेबपोर्टलची केली निर्मिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या कोरोना विषाणूने सर्वजण चिंतेत आहेत. तर पुण्यातील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महत्वपूर्ण कामगिरी करत सर्व सामान्य लोकांना कोरोनाबाबतची सर्व प्रकारची सविस्तर आणि अधिकृत (अद्ययावत) माहिती देणाऱ्या जीव रक्षा या नावाची वेब पोर्टल तयार केलं आहे. विराज राहुल शहा (वय, १५) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

राज्यातील कोरोना संख्येची तुलना करता पुणे जिल्हा कोरोना बाधितांच्या बाबतीत आघाडीवर आहे. रुग्णाची संख्या वाढत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना योग्य माहिती मिळत नाही. यावरून पुण्यातील नववीत शिकणाऱ्या विराजने ‘जीव रक्षा’ या वेबसाईटची निर्मिती करायला जवळपास ८ ते १० महिन्यांचा कालावधी लागला आहे. या निर्मितीच्या कामात त्याच्या संपूर्ण कुटुंबाची त्याला सहकार्य मिळालं आहे. पुणे कोरोना रुग्णालय,प्लाझ्मा, रक्तदान, पुणे महापालिका गृह विलगीकरण, नोंदणी संकेतस्थळ, ऑक्सिजनबाबतची माहिती, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सेवा यासर्व बाबीची तात्काळ माहिती या वेब पोर्टलवरून देण्यात येत आहे. तर https://www.jeevan-raksha.com या संकेतस्थळावर सविस्तर माहिती आहे.

आजच्या काळात एक अतिशय उत्कृष्टतेने कार्य विराजने केले आहे. कोरोनाविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने बनविलेल्या वेबसाईटचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. या वेबसाईटवर कोरोना बाबत सर्व अपडेट सविस्तर माहिती मिळणार आहे. या वेबसाईटवर WHO , आयुष मंत्रालय, भारत सरकार तसेच पुणे महानगरपालिका यांची कोरोना बाबतीतील नियमावली, लसीकरण आणि पुण्यातील लसीकरण केंद्रांची नावे, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, रक्तपेढ्या, ऑक्सिजन बाबत कार्य करणाऱ्या संस्था, ऑक्सिमिटर कसे वापरावे, आरोग्यसेतू, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांचे सल्ले तसेच मार्गदर्शिका, होमिओपॅथी असहून गोष्टी बाबत विविध सविस्तर माहिती तसेच व्हिडिओ या वेबसाईटवर संकलित केले आहेत.

दरम्यान विराज म्हणाला, कोरोना संकट झाल्यापासूनच अभिनव उपक्रम राबवून समाजोपयोगी असे काहीतरी करण्याबाबत विचार सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी पुण्याच्या नायडू आणि ससून रुग्णालयाला कोविड-१९ रोबोट हा सेमी ऑटोमॅटिक यंत्रमानव (रोबो) भेट दिला होता. यावेळी मात्र, परिस्थिती वेगळी होती. माझ्या आईला कोरोनाची लागण झाल्यावर पूर्ण कुटूंबाची धावपळ उडाली होती. याच वेळी मला ‘जीव रक्षा’ वेबसाईटची संकल्पना सुचली. नंतर मग बाबा, आई, बहीण यांच्या मदतीने मागील काही महिन्यापासून काम करून ही वेबसाईट वापरासाठी उपलब्ध करून दिली आहे. ही वेबसाईटवर काम करण्यास अगदी साधं सोपं तिचा वापर करू शकतो.