‘या’ दोघांमुळं बँकांची स्थिती वाईट : अर्थमंत्री सीतारमन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट झाली असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करत रघुराम राजन यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. कोलंबिया विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल अ‍ॅण्ड पब्लिक अफेअर्स’च्या कार्यक्रमात अर्थमंत्री बोलत होत्या. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधत नोटबंदी आणि जीएसटीसंबंधित निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट झाली असल्याचे सांगितले होते.

अर्थमंत्री म्हणाल्या की मी नेहमीच आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा आदर करते, जेव्हा भारताचा विकासदर उच्चांकीवर होता तेव्हा रघुराम राजन यांनी देशाच्या मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व करत होते. परंतू रघुराम राजन यांच्या कार्यकाळात राजकीय नेत्यांच्या एका फोनवर अनेकांना कर्ज देण्यात आले. यामुळे बँकांना आज शिक्षेचा सामना करावा लागत आहे. याच कारणाने झालेल्या नुकसानातून बाहेर पडण्यासाठी बँका सरकारी मदत निधीवर अबलंबून असल्याचे त्या म्हणाल्या.

तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल व्हिजन होते. परंतू असे असले तरी बँकांची स्थिती वाईट झाल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

रघुराम राजन यांची सरकारवर टीका
रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारवर निशाणा साधला होता की भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचे उदाहरण आपण पाहतो आहोत, सुस्तावलेल्या आर्थिक परिस्थितीला नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार आहे. जर हे दोन्ही निर्णय जनता आणि अर्थव्यवस्थेवर लादले नसते तर अर्थव्यवस्थेने उत्तम प्रगती केली असती. सरकारने कोणाचाही सल्ला न घेता नोटाबंदीचा निर्णय लागू केला आहे. यामुळे जनतेचे नुकसानच झाले असून, या निर्णयाने काहीच निष्पन्न झाले नाही असे देखील रघुराम राजन यांनी सांगितले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी