‘कोरोना’च्या संकटात रिलायन्स इंडस्ट्रीजचा निर्णय ! कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा उचलणार खर्च

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गेल्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून आता देशात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढू लागले आहेत. या रुग्णाची संख्या सध्या १,११,७३,७६१ पर्यंत आहे. तर यामुळे आतापर्यंत भारतात १,५७,५४८ इतके लोक मृत्युमुखी पडले आहेत. यावरूनच आता या संकटात भारतात रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कामगारांना मोफत कोरोना डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीचा सर्व खर्च रिलायन्स इंडस्ट्रीज उचलणार आहे. अशी माहिती रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी युद्धपातळीवर शोध सुरू असतानाच बहुतेक ठिकाणी कोरोनावरील लस देखील उपयोगात आल्याचे दिसत आहे. तसेच कोरोना अँटीबॉडी बाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. भारतात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला आता गती आली असून. कोविडयोद्ध्यांनंतर आता सामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरु आहे. तर याबाबीत नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंतीही केली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाचा खर्च देखील कंपनी करणार आहे.

तसेच रिलायन्स फॅमिली डे २०२० च्या मेसेजमध्ये, ‘मुकेश आणि मी दोघांनीही खात्री दिली होती की कोविड-19 लसीला मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रिलायन्स कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लस मिळावी याकरता आम्ही खास योजना आखू. आम्ही त्या ध्येयाशी बांधिल आहोत. तसेच तूमच्या पाठिंब्यामुळे, आपण लवकरच या संकटाला मागे सोडू. तोपर्यंत निराश होऊ नका. अधिकाधिक सुरक्षा आणि स्वच्छतेची खबरदारी घेणे सुरू ठेवा. आपण या सामुहिक लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एकत्र मिळून आपण विजय मिळवला पाहिजे आणि आपण जिंकू, तसेच मेलच्या शेवटी ‘कोरोना हरणार, देश जिंकणार’ असे देखील नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

संशोधनातून एक दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून पुढं आले आहे. तर कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींचे इतर आजारही बरे झाले आहेत. आरोग्यासंबंधित समस्यांना नियंत्रित करण्यातही कोरोना लस प्रभावी ठरत असल्याचं नव्या संशोधनातून समोर आले आहे.