Nitesh Rane | नितेश राणेंच्या छातीत असह्य वेदना, वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR मध्ये दाखल (व्हिडीओ)

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती समोर येत आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांना सोमवारी उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital Kolhapur) नेण्यात आले. परंतु तिथे पोहचण्यापूर्वीच नितेश राणे यांची प्रकृती जास्त बिघडल्याची माहिती समोर येत आहे. राणे यांना रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला नेण्यात येत होते. त्यावेळी राणे यांच्या छातीत अचानकपणे वेदना (Chest Pain) होऊ लागल्या. त्यामुळे तळेरेनजीक राणे यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका (Ambulance) आणि पोलिसांच्या गाड्यांचा (Police Vehicle) ताफा थांबवून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर त्यांना सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.

 

 

सीपीआर रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शिवसेनेचे कार्यकर्ते परब यांच्यावरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी (Sindhudurg Police) अटक केलेल्या भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना वैद्यकीय उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात (Chhatrapati Pramila Raje Hospital) दाखल करण्यात आले. यावेळी राणे समर्थकांसह पोलिसांची मोठी गर्दी झाली होती. आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मिळाली आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखणे वाढल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सायंकाळी साडेचार वाजता वाहनांचा ताफा रुग्णालयात दाखल झाला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता रुग्णवाहिकेतून उतरल्यानंतर आमदार राणे थेट प्राथमिक उपचार केंद्र येथे दाखल झाले. याठिकाणी डॉक्टरांचा मोठा ताफा उपस्थित होता. राणे यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

 

नितेश राणेंच्या कोठडीतील मुक्काम वाढणार

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर (Bail Application) आज (सोमवार) जिल्हा न्यायालयात (District Court) सुनावणी (Hearing) होणार होती. मात्र राज्य सरकारने (State Government) भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे (Bharat Ratna Lata Mangeshkar passed away) राज्यात सुट्टी जाहीर (Public Holiday) केली आहे. त्यामुळे आज न्यायालय बंद असल्याने नितेश राणे यांचा मुक्काम वाढणार आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती बिघडल्याचे कारण देत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात (Sindhudurg District Hospital) दाखल झाले.

 

Web Title :- Nitesh Rane | BJP MLA nitesh rane chest pain incerases during travelling to kolhpur doctors stop the ambulance for treatment near kolhapur CPR Hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा