Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात आईनेच विकले 4 वर्षाच्या मुलाला अन् रचला अपहरणाचा बनाव; पोलीस तपासात फुटले बिंग; 8 जणांना अटक (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) कोथरुड परिसरातून (Kothrud) एका चार वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping Case in Pune) झाल्याची तक्रार आईने पोलिसांकडे केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला असता धक्कादायक माहिती समोर आली. फिर्यादी महिलाच ही या गुन्ह्यातील आरोपी असून तिने एका मध्यस्थामार्फत आपल्या चार वर्षाच्या मुलाला एक लाख रुपयांना विकल्याची (Mother Sold Child) माहिती समोर आली. एवढेच नाही तर महिलेने ज्या व्यक्तीला मुलाला विकले (Pune Crime) त्याने त्या मुलाला दुसऱ्या एका दाम्यत्याला एक लाख 60 हजार रुपयांना विकले. पोलिसांनी अवघ्या 24 गुन्ह्याचा उलगडा करुन 8 आरोपींना अटक केली आहे.

 

प्रियंका गणेश पवार (Priyanka Pawar), जन्नत बशीर शेख (Jannat Bashir Sheikh), रेश्मा सुतार (Reshma Sutar), तुकाराम निंबळे (Tukaram Nimble), चंद्रकला माळी (Chandrakala Mali), भानुदास माळी (Bhanudas Mali), दीपक तुकाराम म्हात्रे (Deepak Tukaram Mhatre) आणि सीताबाई दीपक म्हात्रे (Sitabai Deepak Mhatre) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रियंका पवार हिने शुक्रवारी (दि.4) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) मुलाच्या अपहराणाची तक्रार दिली होती.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका पवार या महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार कोथरुड पोलिसांकडे केली. तक्रार दाखल होताच कोथरुड, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यातील 9 पथके तयार करुन मुलाचा शोध सुरु केला. दरम्यान अपहरण झालेला मुलगा दुपारच्या वेळी याच परिसरात राहणारे बांगडेवाली भाभीसोबत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी जन्नत बशीर शेख (रा. जळकेवस्ती, कोथरुड) हिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

 

सुरुवातीला जन्नत शेखने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलीस नाईक आकाश वाल्मीकी (Akash Valmiki) व पोलीस नाईक विशाल चौगुले (Vishal Chowgule) यांनी सीसीटीव्ही फुटेज तपसाले असता एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे दिसले. आरोपी जन्नत शेख कडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने रेश्मा सुतार आणि फिर्यादी प्रियंका पवार यांच्यासोबत संगनमत करुन कट रचून निल पवार Neil Pawar (वय-4) याला मध्यस्थी तुकाराम निंबळे (रा. मु.पो. वारु ता. मावळ) याच्यामार्फत चंद्रकला माळी व भानुदास माळी (रा. मुपो बोर्लेगाव ता. पनवेल जि. रायगड) यांना एक लाख रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले.

 

पोलिसांनी चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना त्याब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांनी दीपक म्हात्रे व सीताबाई म्हात्रे यांना 1 लाख 60 हजार रुपयात मुलाची विक्री केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून 9 फेब्रुवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस तपास करीत आहेत.

 

पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांनी सांगितले की, आरोपी प्रियंका पवार ही पतीपासून विभक्त राहत असून तिला दोन मुले आहेत. दुसरा मुलगा एक वर्षाचा आहे. दोन्ही मुलांचा सांभाळ करणे अशक्य असल्याने तिने चार वर्षाच्या मुलाला जन्नत शेख, रेश्मा सुतार यांच्या मदतीने मध्यस्थी तुकाराम निंबळे याच्या मार्फत मुलाची विक्री केली. पोलिसांनी म्हात्रे दांपत्याकडून मुलाची सुटका करुन गुन्ह्यातील 1 लाख 81 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. मुलाला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिनी गलांडे (ACP Rukmini Galande)
यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap),
वारजे पोलीस ठाण्याचे (Warje Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke),
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे (Uttamnagar Police Station) सनिल जैतापूरकर (Sanil Jaitapurkar),
सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे (API Balasaheb Bade),

महिला सहायक पोलीस निरीक्षक वृषाली पाटील (API Vrushali Patil), आरती खेतमाळीस (API Aarti Khetmalis),
महिला पोलीस उप निरीक्षक काजोल यादव (PSI Kajol Yadav), किसन राठोड (PSI Kisan Rathod), रतिकांत कोळी (PSI Ratikant Koli),
विक्रम पवार (PSI Vikram Pawar), नागराज बिराजदार (PSI Nagraj Birajdar), चैतन्य काटकर (PSI Chaitanya Katkar),
क्षिरसागर सर्व कोथरुड पोलीस स्टेशन, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक मुंडे
यांच्यासह उत्तमनगर, वारजे आणि कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी केली.

Web Title :- Pune Crime | Shocking! 4-year-old boy abducted by mother in Pune; Bing bursts into police investigation; 8 arrested (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Political News | कुटुंब कलह की कुटुंबातील आणखी एक सदस्य महापालिकेत पाठविण्यासाठी केलेली ‘तडजोड’? राजकीय वर्तुळात चर्चा

 

Anil Parab | एसटी विलीनीकरणाचा अहवाल 2 दिवसात, अनिल परब यांची माहिती

 

Pune – ICAI | ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेची चार पारितोषिकांवर मोहोर