Nitesh Rane | ‘A फॉर अफताब अन् A फॉर आदित्य, सगळ्या विकृतांचे नाव एकसमान’; सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Shinde Group MP Rahul Shewale) यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput Case) आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) गंभीर आरोप केला आहे. रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) जे कॉल आले ते AU नावाने होते असे म्हटले आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. आता या वादात भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील उडी घेतली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांना याप्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांची नार्को चाचणी (Narco Test) करावी, अशी मागणी केली आहे.

बुधवारी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या (Disha Salian) मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. हेच राहुल शेवाळे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे लाडके होते. जेव्हा त्यांच्याच किचन कॅबिनेटमधील एक खासदार सांगतो की, रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंहमध्ये 44 कॉल झाले. त्यांच्यात AU म्हणजे आदित्य ठाकरे आहे, तर याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.

नितेश राणे पुढे म्हणाले, आतापर्यंत आम्ही जे बोलत होतो,
त्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका शेवाळे यांनी घेतली A फॉर आफताब अन् A फॉर आदित्य, सगळ्या विकृतीचे नाव एकसमान झालं आहे. आजही दिशा सानियानच्या मृत्यूची केस मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी. 8 आणि 9 जूनच्या रात्री नेमकं काय झालं? कशामुळे सुशांत सिंहची हत्या झाली. रिया चक्रवर्तीची या प्रकरणात काय भूमिका आहे? या प्रकरणातील तपास अधिकारी दोनदा का बदलले? या गोष्टी उजेडात येणं गरजेचे आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

Web Title :-  Nitesh Rane | bjp mla nitesh rane demand to conduct narco test of aditya uddhav thackeray in sushant singh suicide case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Urfi Javed | उर्फीला मुंबई पोलिसांनंतर दुबई पोलिसांचा दणका ! ‘या’ प्रकरणी केली अटक

Amol Mitkari | ‘नागपूरच्या आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचे पाणी’ – अमोल मिटकरी

Gold Price Today | ऐन लग्नसराईत सोन्याचे दर गगनाला भिडले ! GST सह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार