Homeताज्या बातम्याNitesh Rane | 'मुंबई काय कोणाच्या साहेबांची नाही, पण...', निलेश राणेंचा आदित्य...

Nitesh Rane | ‘मुंबई काय कोणाच्या साहेबांची नाही, पण…’, निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना डिवचलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दहीहंडी उत्सव उत्साहात (Dahi Handi-2022) साजरा हाेत आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनी अनेक ठिकाणी उपस्थिती लावत आरोप प्रत्यारोप केले. शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ‘आज आनंदाचा दिवस आहे. साजरा करा. उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका. जांबोरी मैदानात आम्ही परवानगीच मागितली नव्हती. दोन वर्षापूर्वी अडीच कोटी फंड देऊन सुशोभीकरण केले होते. उगाच राजकारण आणू नका. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून बालिशपणा करु नका’ असा टोला भाजपला (BJP) लगावला, याला आता भाजप नेते (BJP Leader) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उगाच डरकाळी फोडू नका, आशा शब्दात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हल्लाबोल केला आहे.

 

वरळीमध्ये भाजपला आव्हान देण्याची हिंमत कोणी करु नये. विधानसभेत (Legislative Assembly) साधं मी म्याव म्याव आवाज काढल्यावर काय अवस्था झालेली ही संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. म्हणून उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कोणी करु नये. मुंबई काय कोणाच्या साहेबांची नाही पण मुंबई तुमच्यासारख्या असंख्य मुंबईकरांची आहे हे लक्षात ठेवा असे म्हणत नितेश राणेंनी (Nitesh Rane) आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे.

 

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेना प्रत्युत्तर

दीड महिन्यापूर्वी आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय दहीहंडी फोडली आणि सर्वांच्या आशीर्वादाने हे सरकार अस्तित्वात आलं,
असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेंभी नाका (Tembhi Naka)
येथील दहीहंडी कार्याक्रमात वक्तव्य केलं. यावर आदित्य ठाकरे म्हणाले,
कुणी किती थर लावले यात मला पडायचं नाही. 50 थर लावले की थरकाप उडालाय हे सर्वांना माहित आहे.
किमान आजच्या दिवशी तरी सणात राजकारण नको. कारण प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची काही गरज नसते.
24 तास राजकारण करत राहिलं तर सणाचं महत्व तरी काय? त्यामुळे मला त्यात पडायचं नाही, असे ते म्हणाले.

 

Web Title :- Nitesh Rane | bjp nitesh rane slams shivsena aaditya thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News