Nitin Gadkari On Road Accidents | देशात दरवर्षी दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू, नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nitin Gadkari On Road Accidents | देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात, आणि या अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू (Death) होतो, तर 3 लाख लोक जखमी (Injured) होतात, अशी खंत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. दिल्लीतील रस्ता सुरक्षा जागरुकता मोहिमेत बोलताना नितीन गडकरी यांनी देशातील अपघाताबाबत माहिती दिली. (Nitin Gadkari On Road Accidents)

नितीन गडकरी पुढे म्हणाले, देशात रोज 1 हजार 130 अपघात होतात आणि 422 जणांचा मृत्यू होतो. प्रत्येक तासाला 18 मृत्यू आपल्या देशात होतात. 60 टक्के प्रकरणांमध्ये 18 ते 34 वयोगटातील लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यामध्ये इंजिनियर (Engineer), डॉक्टर (Doctor) यांचा देखील मृत्यू होतो. ज्यामुळे जीडीपीचे (GDP) 3.14 टक्के नुकसान होते आणि ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे, अशी खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. (Nitin Gadkari On Road Accidents)

डोंगराळ भागात अपघात होतात हे खरे आहे. पूर्वी क्रॅश बॅरीयर (Crash Barriers) लोखंडाचे असायचे.
आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉक्रिटमध्ये एम्बेड करण्यात येते. यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी ते खाली पडत नाही, तो खाली पडण्याऐवजी मागे येतो.

या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर,
अरुणाचल प्रदेश यांसारख्या अवघड डोंगराळ भागात असे अपघात होतात.
अशा प्रकारचे प्रयोग आम्ही काही भागामध्ये केल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
त्याचा वापर करुन असे अपघात कशा प्रकारे कमी करता येतील याचा प्रयत्न
करत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Session 2023 | ‘बारामती शेजारील मतदारसंघातही उभं राहायचं धाडस नाही’,
अजित पवारांची सभागृहात कबुली