BJP वर नाराज झाले नितीश कुमार! म्हणाले – ‘मला नाही रहायचंय CM, एनडीएनं हवं त्याला बनवावं’

पाटणा : वृत्तसंस्था – अरुणाचल प्रदेशात जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या 6 आमदारांना भाजपाने गळाला लावल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले आहेत. रविवारी पाटणामध्ये आयोजित जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान मोठे वक्तव्य करत नितीश कुमार म्हणाले की, मला मुख्यमंत्री पदावर राहण्याची कोणतीही इच्छा नाही. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, नितीश कुमार यांनी म्हटले की, एनडीएने कुणालाही मुख्यमंत्री बनवावे, मला यामुळे काहीही फरक पडत नाही आणि मला कोणत्याही पदाचा मोह नाही.

नितीश यांनी पुढे म्हटले, माझी मुख्यमंत्री राहण्याची अजिबात इच्छा नाही. माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, तेव्हा मी मुख्यमंत्री पद ग्रहण केले होते. कुणीही सीएम बनवे, कुणाचाही मुख्यमंत्री बनवा, मला कसाल्याही प्रकारचा फरक पडत नाही. अरुणाचल प्रदेशच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत नितीश कुमार म्हणाले की, काय झालं 6 आमदार गेले तर, एक आमदार अजूनही ठाम आहे.

आरसीपी सिंह नवे अध्यक्ष
आपले निकटवर्तीय आरसीपी सिंह यांना जनता दल युनायटेडचे नवीन अध्यक्ष बनवण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी म्हटले की, आम्ही पक्ष सोडलेला नाही आणि जास्त व्यस्त असल्याने पक्षाचे कामकाज प्रभावित होत होते, ज्या कारणामुळे हे पाऊल उचलण्यात आले, जेणेकरून पक्षाचा विस्तार सुद्धा होऊ शकतो आणि लोकांना जास्त वेळ देता येईल. 2019 मध्ये तीन वर्षासाठी जदयूचे पुन्हा अध्यक्ष निवडण्यात आलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजयसभेत आपले नेते सिंह यांच्यासाठी आपल्या पदाचा त्याग केला.

नोकरशाह ते राजकीय नेते बनलेले आरपी सिंह आतापर्यंत प्रादेशिक पक्षाचे महासचिव होते. अरुणाचल प्रदेशात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जदयूला सात जागा मिळाल्या होत्या आणि भाजपा (41 जागा) च्यानंतर तो राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला, परंतु पक्षाच्या 6 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला.