नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जनात पुणे देशात दुसरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणानंतर आता वायुप्रदूषणातही पुणे आघाडीवर आहे.  नायट्रोजन डायऑक्सिडईड या विषारी वायूच्या उत्सर्जनात सध्या देशात पुण्याचा दुसरा नंबर लागतो. यामुळे पुण्यातील वायूप्रदुषणाचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे. पुण्यात हवेतल्या नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण हे २०१३ पासून सातत्याने वाढत आहे. धक्कादायक म्हणजे २०१६ साली नायट्रोजन डायऑक्साईड या वायूच्या उत्सर्जनात पुण्याचा अव्वल क्रमांक होता.

[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3fafa717-b1a0-11e8-8a85-238d49f242e1′]

हे वास्तव माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून पुढे आले आहे. आदित्य राठी यांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती मागवली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही माहिती दिली आहे. आदित्यने देशातील सगळ्यात जास्त नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण असणाऱ्या शहरांची माहिती मागवली होती. पुण्यातल्या हवेतल्या नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण हे २०१३ पासून सातत्याने वाढत आहे. हे प्रमाण मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर या परिमाणात मोजले जाते. २०१३ – ४१, २०१४ – ४५, २०१५ – ६२, २०१६ – ८५, २०१७ –  ६५ असे नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण २०१३ पासून वाढले आहे. २०१६ साली नायट्रोजन डायऑक्साईड या वायूच्या उत्सर्जनात पुण्याचा अव्वल क्रमांक होता. नायट्रोजन डायऑक्साईडचे अर्थातच अनेक वाईट परिणाम मानवी शरिरावर होतात.

जाहीरात 

पुण्यात वाढत असलेल्या प्रदूषणाचे नेमके काय कारण आहे, याचा पाठपुरावा या विषयासंबंधी आरटीआय टाकणारा आदित्य करणार आहे. यामध्ये वाहनांमधून निघणारा धूर हे प्रमुख कारण असल्याचे समजते. वाढत चाललल्या प्रदूषणाची दाहकता पुणेकरांनाही दररोज जाणवते आहे. ते त्यांच्या परीने त्यापासून बचावाचे पर्याही शोधत आहेत, मात्र शासकीय पातळीवर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.