राजू शेट्टी यांच्या विरोधात ‘या’ व्यक्तीने केली आपली उमेदवारी जाहीर 

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन  – हातकणंगले लोकसभा मतदार संघातून सलग दोनदा लोकसभेवर निवडून गेलेले राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने यांनी एल्गार पुकारला आहे. गेली दहा वर्ष राष्ट्रवादीचे निष्ठेने काम करून हि पक्षाने माने गटाकडे कानाडोळा केला आहे. म्हणून आता येत्या लोकसभा निवडणुकीत माने गट आपला स्वाभिमान आणि ताकद राष्ट्रवादीला दाखवून देईल असे निवेदिता माने म्हणाल्या आहेत. त्यांनी आपला मुलगा धैर्यशील माने हा आगामी लोकसभा निवडणूक लढेल असे सांगितले आहे. त्यामुळे तरुण नवख्या उमेदवाराची टक्कर शेट्टींना सहज विजयी करणार कि घाम फोडणार या विषयावर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

आंदोलनाचे ढोंग करून लोकांच्या दुधाचे, शेत मालाचे नुकसान करणाऱ्या नेत्याला येत्या निवडणुकीत जनताच अस्मान दाखवेल असे निवेदिता माने म्हणल्या आहेत. राजू शेट्टी यांनी आंदोलना शिवाय दुसरे काय केले, जनतेने दिलेल्या मतांच्या जीवावर आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचे काम फक्त त्यांनी केले. असा टोलाही माने यांनी लगावला आहे. परंतु सबंध टीका करताना त्यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेताच त्यांच्या दिशेने टीकेचा बाण सोडला. वस्त्र उद्योगाच्या विविध आंदोलना निमित्त त्या सोमवारी इचलकरंजी येथे आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवारांनी कौल दिला नाही
मागील दहा वर्षांपासून माने गटाला फक्त गृहीत धरले जाते आहे. पक्षाच्या कामासाठी वापरून घेतले जाते आहे. परंतु माने गट आता येत्या निवडणुकीत आपली ताकद  दाखवल्या शिवाय राहणार नाही. मागच्या दहा वर्षात आम्ही विधान परिषदेसाठी उमेदवारी मागितली होती परंतु ती उमेदवारी आम्हाला दिली गेली नाही. तर पक्षाने आमचा कसलाच विचार नकेल्याने आता आम्हाला निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसात आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी पवार साहेबांकडे उमेदवारी मागितली होती, परंतु पवार साहेबांनी अद्याप त्या संदर्भात काहीच सांगितले नाही म्हणून आम्ही येणारी निवडणूक स्वबळावर लढायचे ठरवले असून धैर्यशील माने लोकसभेची उमेदवारी करणार आहेत, असे माने म्हणाल्या.

‘घरात टोपी बाहेर टिळा, हाच राहुल गांधींचा खरा चेहरा’ 

आयत्या पिठावर रेगोट्या मारणाऱ्या माणसांना आता जनता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असे निवेदिता माने म्हणाल्या.आता आगामी निवडणुकीत राजू शेट्टींना आवाहन देण्यासाठी माने गट किती सरस ठरतो आहे. हे बघण्यासारखे राहील तसेच नाराज माने गटाला भाजप आपल्या बाजूने ओढून घेईल का ते हि पाहण्यासारखे राहील.