18 ऑक्टोबरनंतर पुण्यासह ‘या’ 6 एयरपोर्टवरून उडणार नाही Air India ची विमानं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी तेल कंपनी IOC (Indian Oil Corporation) ने भारतीय विमान कंपनी एअर इंडियाला इंधन देण्यास नकार दिला आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण रक्कम न मिळाल्यास देशातील ६ प्रमुख विमानतळांवर इंधन पुरवठा पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. IOC ने याविषयी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि, एअर इंडियाने प्रत्येक महिन्यात 100 कोटी रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. याआधी 22 ऑगस्ट रोजी देखील कोची, पुणे, मोहाली, पटना, रांची आणि विशाखापट्टणम विमानतळांवरील इंधनपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर नागरी विमान मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे 7 सप्टेंबर रोजी पुन्हा येथील उड्डाणे सुरु करण्यात आली होती. मात्र आता हा निर्णय घेतल्यामुळे आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची चिंता सतावत आहे.

मागील आठवड्यात बीपीसीएल आणि एचपीसीएलने एअर इंडियाला पत्र लिहून त्वरित थकबाकी जमा करण्याची विनंती केली होती. मात्र अजूनपर्यंत ती जमा न केल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

500 कोटी रुपये बाकी
एअर इंडियाकडून IOC ला 500 कोटी रुपये देणे शिल्लक असून मागील आठ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची रक्कम दिली गेलेली नाही.

18 ऑक्टोबरपर्यंत मुदत
या प्रकरणी IOC ने पत्र लिहून एअर इंडियाला नोटीस दिली असून 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण पैसे जमा करण्यास सांगितले आहेत.

तोट्यात चालू असलेल्या एअर इंडियावर सध्या 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून मागील आर्थिक वर्षात कंपनीला 8,400 कोटी रुपायांचा तोटा झाला होता. त्यामुळे सरकार यामध्ये खासगी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधी देत असून पुढील महिन्यापासून यासाठी प्रक्रिया सुरु होणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी