‘ग्लोबल रँकिंग’मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाला ‘टॉप’ 300 मध्ये ‘स्थान’ नाही !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – नुकत्याच आलेल्या ग्लोबल रँकिंग 2020 च्या टॉप – 300 मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाच्या नावाचा समावेश नाही. 2012 नंतर ही पहिली क्रमवारी आहे ज्यात टॉप 300 मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. परंतू भारताने ओवरऑल रँकिंगमध्ये 2018 च्या तुलनेत आपली क्रमवारी सुधारली आहे, यंदा या क्रमवारीत भारतीय विद्यापीठाची संख्या जास्त आहे. 2018 साली या यादीत 49 संस्थांना स्थान मिळाले होते. तर यंदा 56 संस्थाना स्थान मिळाले आहे. परंतू याच यादीत चीनच्या विद्यापीठांची संख्या जास्त आहे. चीनचे Tsinghua विद्यापीठ ग्लोबल रँकिंगमध्ये 23 व्या स्थानी आहे तर Peking 24 व्या स्थानी.

 
ही रँकिंग टाइम्स हायर एज्युकेशनची वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंग 2020 आहे. ही रँकिंग शैक्षणिक संस्थाचे प्रदर्शन आणि शैक्षणिक स्तर यावर आधारित असते. यात 92 देशांच्या एकूण 1,300 विद्यापीठांचा समावेश आहे.  
 
कोणतीही आहेत सर्वश्रेष्ठ विद्यापीठ –
मागील चार वर्षांपासून यूनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड पहिल्या स्थानी आहे. यंदा देखील तीच यूनिवर्सिटी पहिल्या स्थानी आहे. अशियातील फक्त 2 विद्यापीठ सर्वश्रेष्ठ यादीत वरच्या क्रमांकावर आहेत, परंतू त्या देखील चीनमधील आहेत.  
 
टॉप 5 विद्यापीठे –
1. यूनिवर्सिटी ऑफ ऑक्‍सफोर्ड (ब्रिटेन)
2. कॅलिफोर्निया इंस्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी (अमेरिका)

3. यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज (ब्रिटेन)
4. स्‍टँडफोर्ड यूनिवर्सिटी (अमेरिका)
5. मेसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अमेरिका)

 
टॉप – 500 मध्ये भारतीय विद्यापीठांना स्थान –
टॉप – 300 मध्ये भारतीय विद्यापीठांनी आपले स्थान निर्माण केले नसले तरी टॉप – 500 मध्ये भारतातील 6 विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे. 

यात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, रोपड पहिल्या 350 मध्ये आहे. तर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु टॉप 500 मध्ये आहे. IIT दिल्ली,  IIT खडकपूर आणि जामिया मिल्लिया सह काही विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.
 
Loading...
You might also like