अभिमानास्पद ! इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवली पाण्यावर चालणारी ‘बाइक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तेरणा इंजिनीअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांनी पाण्यावर धावणारी बाइक तयार केली आहे. केवळ ८ हजार रुपये खर्च करून त्यांनी हा प्रकल्प साकारला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या हिमांशू पेडणेकर, सिद्धार्थ जोशी, सतिश आंबेटकर या विद्यार्थ्यांनी हा आश्चर्यजनक शोध लावला आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना प्राध्यापक रवि येरिगेरी यांनी मार्गदर्शन केले.

प्रकल्पासाठी वापरलेले तंत्रज्ञान –

पाण्यावर चालवण्यापूर्वी दुचाकीची पेट्रोलची टाकी पूर्णपणे रिकामी करणं आवश्यक आहे. हा प्रयोग करण्यासाठी पाण्याच्या चार छोट्या बाटल्या त्यांनी दुचाकीला बांधल्या होत्या. ह्या प्रयोगात त्यांनी इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेचा वापर केला आहे. इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेत एक बॅटरी, मीठ घातलेलं पाणी, धातूचे रॉड यांचा उपयोग करून हायड्रोजन गॅस तयार केला जातो. हा गॅस रिकाम्या बाटलीमध्ये जमा करून नंतर तो दुचाकीच्या कॉर्बोरेटरमध्ये सोडला जातो. त्यानंतर दुचाकीला किक मारून इंजिन सुरू केलं जात व बाईक पाण्यावर धावते.

या प्रयोगाविषयी माहिती देताना विद्यार्थ्यांनी माहिती दिली की , ‘पाणी हा अपारंपरिक ऊर्जास्रोत असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी हा प्रोजेक्ट आम्ही केला. या प्रोजेक्टची प्रेरणा आम्हाला स्टॅन्ली मेयर्स यांच्याकडून मिळाली.’

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन