Nobel Prize 2023-Medicine Physiology | मेडिसीनचे नोबेल करोना लस शोधणारे कॅटेलिन कॅरिको आणि डू वीजमॅन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : Nobel Prize 2023-Medicine Physiology | नोबेल पुरस्कारांची घोषणा आजपासून सुरु झाली असून कोरोनावरील mRNA लस शोधणारे शास्त्रज्ञ कॅटेलिन कॅरिको आणि डू वीजमॅन यांना शरीर विज्ञान किंवा औषधशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. (Nobel Prize 2023-Medicine Physiology)

संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटात होते, या रोगावर कोणतेही औषध नसल्याने लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागत होते. अशावेळी कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस एक करत होते. यापैकीच एक होते कॅटिलिन कॅरिको आणि डू वीजमॅन. (Nobel Prize 2023-Medicine Physiology)

कॅटिलिन कॅरिको आणि डू वीजमॅन यांनी २०२० मध्ये mRNA लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले. बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी कॅटेलिन कॅरिको आणि डू वीजमॅन या दोघांनी शोध लावलेल्या mRNA या वापर केला. पुढे बायोएनटेक यांनी फायजर तर मॉडर्नाने वीआसी/ एनआयएच यांच्या सहकार्याने लसींची निर्मिती केली.

कॅटिलिन कॅरिको यांची माहिती

  • हंगेरीच्या जोलनोकमध्ये १९५५ मध्ये जन्म
  • १९८२ मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएच.डी
  • फिलाडेल्फियाच्या के टेंपल विद्यापीठात संशोधन पूर्ण
  • पेन्सिलवेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक
  • बायोएनटेक आरएनए या औषध निर्मिती कंपनीच्या २०१३ नंतर वरिष्ठ उपाध्यक्ष झाल्या

डू वीजमॅन यांची माहिती

  • १९५९ मध्ये मैसाच्यूसेटसमध्ये जन्म
  • १९८७ मध्ये पीएच.डी आणि एमडी पदवी पूर्ण
  • हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये काम केले
  • १९९७ मध्ये स्वत: चा संशोधन ग्रुप सुरु
  • सध्या पेन इन्स्टिट्यूट आणि आरएनए इनोवेशन्सचे संचालक

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत वादंग?