Coronavirus : खळबळजनक ! ‘कोरोना’ मानवनिर्मित असल्याचा नोबेल विजेत्या ‘या’ ख्यातनाम वैज्ञानिकाचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचा दावा फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी केला आहे. अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी यांसारख्या देशांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यातच चीन आणि अमेरिका हे देश एकमेकांवर निशाणा साधत आहेत.

फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचे म्हटले आहे. कोरोनामध्ये एचआयव्हीचे एलिमेंट सापडले आहेत. त्यात मलेरियाचेही काही एलिमेंट सापडले असल्याचे आहेत. त्यावरून हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होत आहे. व्हायरसचा जन्म प्रयोगशाळेत करण्यात आला असून तो मानवनिर्मित व्हायरस आहे. एड्सच्या प्रसार करणार्‍या व्हायरसवर लस तयार करण्याच्या निमित्ताने हा घातक व्हायरस तयार करण्यात आल्याचे ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी सांगितले आहे. यामुळेच कोरोना व्हायरसच्या जिनोममध्ये एचआयव्हीचे काही एलिमेंट्स सापडले आहेत. याव्यतिरिक्त त्यात मलेरियाचेही काही एलिमेंट्स असण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. चीनच्या वैज्ञानिकांची एक टीम वुहानमधील एका प्रयोगशाळेत एड्सवरील लस तयार करण्यासाठी कोरोना व्हायरसचा वापर करत होते, त्यामुळेच सुरूवातीच्या कोरोना लसीमध्ये जिनोम सापडले होते. परंतु सध्या याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. वुहान इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी हे अशाप्रकारचे व्हायरस तयार करण्यात एक्स्पर्ट असल्याचे डॉ. ल्यूक यांनी सांगितले.