“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | पहिली ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी, अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

पुणे, १६ ऑक्टोबरः “Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत समर्थ डोरनळ याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा २३ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १४५ धावांचे आव्हान उभे केले. सिद्धेश जावळेकर (३६ धावा), स्वयम जाधव (३६ धावा) आणि पृथ्वीराज मिसाळ (२६ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. याला उत्तर देताना कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १२२ धावांवर मर्यादित राहीला. सुमेध जेवारे याने २९ धावांची खेळी केली. समर्थ डोरनळ याने १८ धावात २ गडी बाद केले. सुदर्शन रणखंबे आणि प्रथमेश वाघमारे यांनी अचूक गोलंदाजी करून संघाच्या विजय सोपा केला.

आधार सावंत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमीने श्री समर्थ क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ३ गडी
राखून पराभव केला. प्रथम खेळताना श्री समर्थ क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १६१ धावा धावफलकावर लावल्या. सागर पवार याने ४६ धावा आणि स्वरूप मोरे याने ४१ धावा करून संघाला १६० धावांचा टप्पा गाठून दिला. आधार सावंत याने १३ धावात ३ गडी टिपले. प्रज्वल धनवटे याच्या ५९ धावा, आधार सावंत याच्या नाबाद ३४ धावा आणि सौरभ पडवळ याच्या ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमीने हे लक्ष्य पूर्ण करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १४५ धावा (सिद्धेश जावळेकर ३६, स्वयम जाधव ३६, पृथ्वीराज मिसाळ २६,
विराज कांबळे २-२२) वि.वि. कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १२२ धावा (सुमेध जेवारे २९,
प्रणव रायरीकर १९, समर्थ डोरनळ २-१८, सुदर्शन रणखंबे २-११, प्रथमेश वाघमारे २-२८); सामनावीरः समर्थ डोरनळ;

श्री समर्थ क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १९.२ षटकात १० गडी बाद १६१ धावा (सागर पवार ४६, स्वरूप मोरे ४१, जयेश जयभय २१,
आधार सावंत ३-१३, कार्तिक जगताप २-३४) पराभूत वि. अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १६२ धावा
(प्रज्वल धनवटे ५९ (४५, ७ चौकार), आधार सावंत नाबाद ३४, सौरभ पडवळ ३१, रविशंकर गिरवाळकर २-१६);
सामनावीरः आधार सावंत;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांना ‘समाजवाद’ शब्द माहित आहे का?’

Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil | शाई फेक योग्य नाही – आमदार रोहित पवार

Amol Mitkari | भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर यांचे अजितदादांवर आरोप – अमोल मिटकरी

Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 49 वी स्थानबध्दतेची कारवाई