नो टेन्शन ! 25 दिवसांचा बॅटरी ‘बॅकअप’, फक्त 1999 रूपयांत ‘या’ कंपनीचा नवा फोन लाँच

पोलीसनामा ऑनलाईन टीम : समजा, ऐन कामाच्या वेळी तुमचा मोबाईल स्विच ऑफ झाला किंवा नोकरीच्या ठिकाणी मोबाईलचा चार्जर घेऊन जायला विसरलात आणि त्याचवेळी मोबाईल स्विच ऑफ झाला तर काय कराल …? ग्राहकांच्या याच अडचणी ओळखून नोकियाने एकदा चार्ज केला की तब्बल २५ दिवस चालणारा (बॅटरी बॅकअप देणारा) नवा फीचर फोन भारतात लाँच केला आहे. या फोनची विक्री मंगळवारी (ता.२०) पासून सुरु झाली आहे. नोकिया १०५ (२०१९) असं या फीचर फोनचं नाव आहे. दर्जेदार आणि सर्वोत्तम बॅटरी बॅकअप ही याची विशेष बाब आहे.

फक्त १९९९ रुपये इतकी या मोबाईल असून त्यात यामध्ये १.७७ इंचाचा कलर स्क्रीन डिस्प्ले आहे. दमदार बॅटरीमुळे २५ दिवस टिकणारा बॅटरी बॅकअप आणि चौदा तासांहून अधिक टॉकटाइम मिळण्याचा कंपनीने दावा केला आहे. नोकियाच्या ऑनलाइन स्टोअर्स आणि देशभरातील अव्वल रिटेल आउटलेट्समध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनमध्ये आइसलँड कीमॅट डायल पॅड, क्लासिक स्नेक गेम आणि कलर्ड पॉलीकार्बोनेट बॉडी आहे. स्नेक गेमशिवाय यामध्ये टेटरिस, स्काय गिफ्ट, एअरस्ट्राइक, निट्रो रेसिंग, निंजा अप आणि डेंजर डॅश हे गेम प्रीलोडेड आहेत. यात दोन हजार संपर्क क्रमांक आणि ५०० मेसेज जतन करता येतील. शिवाय मध्ये ४जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोनची वैशिष्ट्ये
– हा फोन निळा, गुलाबी, आणि काळा या रंगांमध्ये मिळणार आहे.
– यामध्ये ४ एमबी रॅम आणि ४जीबी इंटरनल स्टोरेज आहे. आठशे मेगाहर्ट क्षमतेची बॅटरी आणि पंचवीस  दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल

– फोनमध्ये ३.५ एलमएमचा ऑडियो जॅक

– एफएम रेडिओ आणि एलईडी टॉर्चलाइट

आरोग्यविषयक वृत्त