10 वर्षाच्या सेवेपूर्वी मृत्यू झाल्यास वारसदारास 10 लाखांचे सानुग्रह अनुदान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काही वर्षांपूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा होणार असून नवीन निवृत्ती वेतन योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्याचा जर दहा वर्षांची सेवा पूर्ण होण्याआधी मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना दहा लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खासगी अनुदानित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना तसेच शंभर टक्के अनुदानित असलेल्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना देखील हि योजना लागू होणार आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांसाठी हि योजना लागू होणार असून यासाठी या योजनेचा समावेश राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी हि योजना लागू होणार आहे. या कर्मचाऱ्यांनाच मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांच्या खात्यावर हि रक्कम थेट जमा केली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे या योजनेत खाते उघडले गेले नसेल त्यांना देखील हि रक्कम मिळणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिक्षकांना याचा फायदा होणार असून यामुळे त्यांच्या कुटुंबियांना देखील सुरक्षितता मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like