खुशखबर ! एलपीजी गॅस च्या किमतीत मोठी घसरण ; ‘एवढ्या’ रुपयांनी होणार स्वस्त

१ जुलै पासून नवीन दर लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये रोज वाढ होत आहे. तसेच महागाईने सामान्य माणसानचे कंबरडे मोडले आहे. अशात एक दिलासादायक बातमी आहे. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचे भाव तब्ब्ल १००.५० रुपयांनी कमी झाले असून हे नवीन दर उद्या म्हणजे १ जुलै पासून लागू होणार आहेत.

याबद्दलची अधिकृत माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे रविवारी दिली. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटल्याने हे बदल करण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. या बदलामुळे आता ग्राहकांना विनाअनुदानित सिलेंडर घेताना एक जुलैपासून ७३७.५० रुपयांऐवजी ६३७ रुपये एवढे पैसे आकारले जातील.

एलपीजी दरांमध्ये घट झाल्यामुळे अनुदानित सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना १४२.६५ रुपयांचं अनुदान मिळेल. त्यानंतर एलपीजीचे दर ४९४.३५ रुपये होतील. अनुदानित सिलेंडर घेणारे ग्राहक सिलिंडर घेताना आधी बाजारमूल्याप्रमाणे पैसे भरतात. त्यानंतर शासनातर्फे मिळणार अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होतं. गेल्या महिन्यात सिलेंडरच्या दरात ३.६५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. ही दरवाढ १ जून पासून लागू करण्यात आली आहे. त्यानंतर एकाच महिन्यात किमतींमध्ये झालेला हा दुसरा बदल आहे.

जाणून घ्या : योग्य ‘परफ्युम’ची निवड आणि वापर कसा करावा

जाणून घ्या… केसर असली आहे की नकली ; अशी करा टेस्ट

कमी झोपेमुळे वाढते गोड आणि खारट पदार्थ खाण्याची इच्छा

यापैकी १ % आरक्षण कमी करून अनाथांना द्या – बच्चू कडू

मराठा आरक्षण मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामुळे न्यायालयात ‘टिकलं’