नोराच्या फतेहीच्या ‘या’ डान्स मुव्सची सोशलवर ‘चर्चा’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये डान्सचा उल्लेख केला तर सर्वात आधी जर कोणता चेहरा समोर येत असेल तर तो म्हणजे अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही. आपल्या डान्सनं नोरा चाहत्यांना नेहमीच मंत्रमुग्ध करत असते. नुकतीच नोरा स्ट्रीट डान्सर थ्रीडी या सिनेमात दिसली. या सिनेमातील हाए गरमी या गाण्यावर तिनं हॉट मुव्स केल्या आहेत. तिच्या स्टेप्स चाहत्यांना खूपच आवडल्या आहेत. तिचं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. नोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

नोराचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यानंतर तिचं मोठं कौतुक होताना दिसत आहे. या व्हिडीओत नोरा ग्रुप डान्स करताना दिसत आहे. तिची अदा आणि तिच्या मुव्स खरंच कौतुकास्पद आहेत. व्हिडीओत इतरही अनेक मुली दिसत आहेत. परंतु नोराच्या डान्स स्टेप्सनं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांनी तर या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सध्या नोराचा हा डान्स व्हिडीओ सोशलवर धुमाकूळ घालत आहे ज्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

नोराच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर नोरानं पिंक कलरचा टॉप आणि ग्रे टाईट घातली आहे. दिसायला बोल्ड असणारी नोरा या आउटफिटमध्ये आणखीच हॉट दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नोरा तिच्या पॅरीसमध्ये होणाऱ्या एक शोमधील डान्सची रिहर्सल करत आहे.

You might also like