Nora Fatehi | डान्सर नोरा फतेही आता साकारणार चित्रपटामध्ये भूमिका; दाक्षिणात्य सुपरस्टार सोबत करणार स्क्रीन शेअर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची सुपरकुल डान्सर म्हणून ओळखली जाणारी डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) ही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. नोराच्या जबरदस्त डान्स मुव्हज् व हटके स्टाईलमुळे (Nora Fatehi Dance Moves) ती नेहमी चर्चेत असते. नोरा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. डान्सर नोरा फतेही ही कॅनडाहून बॉलीवुडमध्ये (Bollywood News) अभिनेत्री बनण्यासाठी आली होती. आता नोरा फतेही (Nora Fatehi) हिचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नोरा लवकरच एका बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटामध्ये भूमिका (Nora Fatehi In Movie) साकारताना दिसणार आहे.

डान्सर म्हणून बॉलीवुडवर अधिराज्य करणारी नोरा आता अभिनेत्री (Nora Fatehi As Actress) म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नोराचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. नोराला जॅकपॉट लागला असून ती दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज (Superstar Varun Tej) सोबत चित्रपटामध्ये काम करण्यासाठी सज्ज आहे. मात्र यावर नोराने मौन बाळगले असून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नोराच्या या दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल, तिच्या भूमिकेबद्दल व चित्रपटाच्या नावाबद्दल अद्यप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. चित्रपटाचे नाव वीटी14 (VT14 Movie) असे असल्याचा अंदाज समोर येत आहे.

डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) ही नेहमी चाहत्यांसोबत तिच्या लाईफ अपडेट शेअर करत असते. मात्र तिच्या आगामी चित्रपटाबाबत तिने कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही. नोराने यापूर्वी अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सोबत भुज: द प्राईड ऑफ इंडिया (Bhuj: The Pride of India) या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट आपली कमाल दाखवू शकला नाही. मात्र आता नोरा फतेही दाक्षिणात्य चित्रपटामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सध्या तिचा ‘हिप हॉप इंडिया’ डान्स शो (Hip Hop India Dance show) सर्वत्र गाजत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2000 रुपये लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Population Of Pune | पुणे शहराची लोखसंख्या 2047 पर्यंत पोहोचणार 1 कोटींवर !
पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे