Photos : ऐन उन्हाळ्यात नोरा फतेहीच्या फोटोंनी वाढवली ‘गरमी’ ! फक्त लुकच नव्हे, तर पोजही दिल्या Bold

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस, डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशलवरून शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओ मुळंही नोरा चर्चेत येत असते. पुन्हा एकदा नारोनं आपल्या लुकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नोरानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात नोरा खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं गोल्डन कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. केवळ तिचा लुकच बोल्ड नाहीये तर तिच्या पोजही तितक्याच बोल्ड आणि मादक आहेत. फोटोत नोरा तिचे हॉट लेग्ज फ्लाँट करताना दिसत आहे.

नोराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमातही तिनं काम केलं आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खास काही चालले नाहीत.