उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगच्या क्रूरतेचा नवीन चेहरा पुन्हा जगासमोर

प्योंगयांग वृत्तसंस्था : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगच्या क्रूरतेचा नवीन चेहरा नुकताच पुन्हा जगासमोर आला आहे. आपल्या जनरलला मृत्युदंडाची शिक्षा ठोठवताना ‘पिरान्हा’ या नरभक्षी माशांच्या टँकमध्ये जनरलला टाकून माशांकडून लचके तोडत असताना जनरलच्या किंकाळीवर किम जोंगच्या चेहऱ्यावर आसुरी हास्य पाहून त्याच्या कर्मचाऱ्यांना हादरा बसला आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग हा त्याच्या क्रूरकृत्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. डेली स्टार या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी किमने एका जनरलला ‘पिरान्हा’ या नरभक्षी माश्यांच्या टँकमध्ये फेकण्याची शिक्षा देत मृत्यूदंड ठोठावला. विशेष म्हणजे माशांचा हा टँक त्याच्या अंगणातच असून मासे जनरलचे कसे लचके तोडत आहेत हे किम बेडरुमच्या खिडकीतून बघत होता. जनरलच्या प्रत्येक किंकाळीला किम हसत होता. त्याचे ते आसूरी हास्य बघून त्याचे कर्मचारीही हादरले होते.१९६५ साली जेम्स बॉंडचा ‘यू ओनली लिव्ह ट्वाइस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एका दृश्यापासून प्रेरणा घेत किमने जनरलला पिरान्हाच्या टँकमध्ये फेकल्याचे डेली स्टारने म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका