पुण्यातील १७ अनधिकृत शाळांना पालिकेच्या नोटीसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरामध्ये अनधिकृत शांळांवर कायद्यानुसार पालिकेने बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरामध्ये तब्बल १७ अनधिकृत शाळा सुरु असून यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या १५ शाळांचा समावेश आहे. तर एक मराठी व एक उर्दू शाळा आहे. या शाळांनी मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न केल्यास शिक्षण हक्क कायद्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
[amazon_link asins=’B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69d46f15-9e1d-11e8-950b-cd37fd1693f6′]

शहरातील मिस क्लर्क स्कूल (नाना पेठ), मरियमड स्कूल (कोंढवा), दर ए अरकम उर्दू प्राथ. स्कूल (उर्दू), जिंगल बेल (कोंढवा), ब्लू बेल (कोंढवा), ज्ञान प्रबोधिनी विद्यामंदिर (काळेपडळ, हडपसर), न्यू हॉरिझोन इंग्लिश स्कूल (कोंढवा), सनलाईट इंग्लिश मीडियम (काळेपडळ, हडपसर), सेंट झेव्हीअर (सिंहगड रोड), द होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल (वडगावशेरी), सिल्हर बेल ट्री स्कूल (खराडी, पुणे), म. गांधी इंटरनॅशनल स्कूल (संजय पार्क, विमाननगर), इनामदार इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल (वडगावशेरी), व्हिक्टोरीयस किड्स स्कूल (खराडी), ई कोल हेरिटेज (औंध), एज्युकॉन स्कूल (बाणेर) आदी शाळांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
[amazon_link asins=’B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’715c8909-9e1d-11e8-9635-b3bd172d9d4d’]

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालकांच्या वतीने शाळा सुरू होण्यापूर्वीच अशा शाळांची यादी जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मान्यता नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत, असे अपेक्षित आहे. संबंधित शाळा ३० जूननंतर सुरू राहिल्यास यासंबंधीचा अहवाल शिक्षण संचालक यांच्यामार्फत शासनाला सादर करण्यात यावा; तसेच अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या शाळा व्यवस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.