सराईताचे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरात कुणीही नसल्याचे पाहून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या एका चोरीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे.

विक्रांत लक्ष्मण बोरकर ( नागपूर चाळ येरवडा) असे त्याचे नाव आहे. तर पिडीतेने यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून मे २०१८ मध्ये तिच्यावर विक्रांत बोरकर याने वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली. तिने एका मुलाला जन्मही दिला आहे. त्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु विक्रांत हा परिसरातील गुन्हेगार असून तो सध्या चोरीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. तिच्यावर अत्याचार झाले तेव्हा ती अल्पवयीन होती. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.