LPG Gas Cylinder : 9 रुपयात गॅस सिलेंडर बुक करण्याची शेवटची संधी, ‘या’ पध्दतीनं करा पेमेंट

नवी दिल्ली : तुम्ही सुद्धा गॅस सिलेंडरचे बुकिंग करणार असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. तुम्ही 809 रुपयांचा सिलेंडर केवळ 9 रुपयात बुक करू शकता. म्हणजे तुम्ही पूर्ण 800 रुपये वाचवू शकता. पेटीएमकडून ग्राहकांना ही विशेष ऑफर दिली जात आहे. 30 एप्रिल 2021 पर्यंत या ऑफरचा फायदा घेऊ शकता. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे आता एक दिवसच शिल्लक आहे-

पेटीएमने या ऑफरला ‘फर्स्ट टाइम’ नाव दिले आहे. म्हणजे या ऑफरचा फायदा केवळ तेच ग्राहक घेऊ शकतात जे पहिल्यांदा गॅस सिलेंडर बुकिंग पेटीएमद्वारे करत आहेत. याशिवाय जुन्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळणार नाही.

किती मिळेल कॅशबॅक
जेव्हा तुम्ही गॅस बुकिंगसाठी पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला 800 रुपयांचे स्क्रॅच कार्ड मिळेल. यात तुम्हाला 10 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

पेटीएमवर अशी मिळेल कॅशबॅक ऑफर
* सर्वप्रथम आपल्या मोबाइल फोनमध्ये पेटीएम अ‍ॅप डाऊनलोड करा.
* यानंतर गॅस एजन्सीकडून सिलेंडर बुकिंग करावे लागेल.
* यासाठी पेटीएम अ‍ॅपमध्ये शो मोअर वर क्लिक करा.
* आता रिचार्ज अँड पे बील्सवर क्लिक करा.
* यानंतर बुक सिलेंडर पर्याय दिसेल.
* येथे जाऊन गॅस प्रोव्हायडर सिलेक्ट करा.
* बुकिंगच्या अगोदर FIRSTLPG चा प्रोमो कोड टाका.
* बुकिंगच्या 24 तासांच्या आत कॅशबॅकचे स्क्रॅच कार्ड मिळेल.
* हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.