अचानक काजोलच्या आईच्या प्रकृतीत बिघाड ; लिलावती हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचे पिता वीरू देवगन यांचं नुकतंच निधन झालं. यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, काजोलची आई तनुजा यांचीही तब्येत बिघडली आहे. त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. काजोल आपल्या आईला भेटायला तिथे गेली होती. त्यांच्या तब्येतीची अजून माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु काजोलला रुग्णालयाच्या परिसरात स्पॉट करण्यात आलं आहे.

दरम्यान, काजोलचा रुग्णालय परिसरातील फोटो समोर आल्यानंतर तिचे चाहतेही काळजीत पडले आहेत. अनेकांनी तिला कमेंट करत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी हेच विचारलं आहे की, सर्वकाही ठिक आहे का ? काहींनी असाही प्रश्न विचारला आहे की, कुटुंबात हे सगळं असं का घडत आहे. काहींनी थेट अशी कमेंट केली आहे की, काजोलची आई तनुजा यांची तब्येत खराब आहे. काजोलचा हा फोटो सेलेब फोटोग्राफरकडून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/ByA4oANH7U-/?utm_source=ig_embed

अजय देवगनचे वडिल वीरू देवगन यांनी 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. स्टंटमॅन म्हणून विरू देवगन यांना सर्वजण ओळखतात. अॅक्शन डारेक्टर तसेच दिग्दर्शक आणि निर्माते म्हणूनही वीरू देवगन यांची एक वेगळी ओळख आहे. सोमवार (दि 27 मे 2019) त्यांनी जगाचा निरोप घेतला.