हुश्श ….! इंधनाच्या दरात ५ रुपयांची कपात

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

पेट्रोल डिझेलचे  दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. दरवाढीवरून सामान्य जनतेच्या मनात सरकाराबद्दल रोष आहे. पण आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करणे केंद्र सरकारच्या हातात नाही असं म्हणणाऱ्या केंद्र सरकारने आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अडीच रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर राज्य सरकारनेही अडीच रुपयांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याचे ठरवल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमती पाच रुपयांनी स्वस्त होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’283b4e14-c7c5-11e8-8329-b1d41874e745′]
इंधनावरील एक्साईज ड्युटी १ रुपया ५० पैसे कमी होईल, तर ओएमसी म्हणजे तेल कंपन्यांकडून १ रुपयांची कपात करण्यात येईल. केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांच्या कपातीमुळे ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार आहे. इतर राज्यांत पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार असले तरी महाराष्ट्रात मात्र पाच रुपयांनी स्वस्त होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राज्य सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात करणार असल्याचे म्हटले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या घोषणेमुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दर पाच रुपयांनी स्वस्त होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून सरकार चिंतेत आहे. इंधनदरांच्या वाढत्या किंमतीवरून अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या परिणामांना रोखण्यासाठी सरकार अनेक पर्यायांवर विचार करीत आहे. इंधन दरांच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी जेटली यांनी बुधवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली होती. तेल कंपन्यांकडून आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे १५ पैसे आणि २० पैशांची दरवाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ८४ रुपयांवर तर डिझेलचा दर ७५.४५ रुपयांवर पोहोचला आहे. केंद्राने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अडीच रुपयांची कपात केली तशी राज्य सरकारनेही अडीच रुपयांची कपात करावी. म्हणजेच पेट्रोलवरचा व्हॅट राज्य सरकारने कमी करावा. राज्य सरकारने असे केल्यास ग्राहकांना पाच रुपयांचा दिलासा मिळेल.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B078BNQ313,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4df77dd0-c7c5-11e8-9f1f-3fd7c331d355′]
यासंदर्भात आम्ही देशातील सर्व राज्यांशी चर्चा करणार आहोत, असेही अरुण जेटली यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारच्या या आवाहनाला महाराष्ट्र सरकारने तात्काळ प्रतिसाद दिला असून पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात करण्याचे ठरवले आहे.
मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार असून नव्या दराप्रमाणे पेट्रोल 86.34 आणि डिझेलचा दर 77.60 रुपयांना मिळेल.