‘निधी’अभावी जवानांना स्वत:च्या पैशाने गणवेश घ्यावा लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्र सरकारने लष्करालाच अतिरीक्त निधीसाठी नकार दिल्याने, लष्कराने अनेक खर्चात कपात केली आहे. त्यामुळे आता जवानांना त्यांचा गणवेश व इतर सामग्री स्वतःच्या खर्चातूनच घ्यावी लागणार आहे.

ऑर्डिन्स फॅक्टरीमधून भारतीय लष्कराला साहित्य पुरवठा होण्याचे प्रमाण 94 होते. मात्र, अतिरीक्त निधीसाठी नकार दिल्यामुळे ते प्रमाण आता 50 टक्यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे अतिरिक्त निधीअभावी ऑर्डिन्स फॅक्टरी मधून होणाऱ्या खरेदीला आळा घालण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे. छोटे युद्ध उद्भवल्यास आपात्कालीन स्थितीत दारुगोळा घेण्यासाठी या पैशांचा उपयोग करता येणार आहे.