आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘पोलीसमामा’ची करडी नजर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

देशातला बहुतांश व्यक्तींकडे स्मार्ट फोन असून त्यामध्ये व्हॉट्सअॅप वापरण्यांची संख्या जास्त आहे. प्रत्येकाचे आपापले ग्रुप असतात. शाळा, कॉलेज, ऑफीस, मित्र किंवा वेगवेगळ्या भागातील ग्रुप असतात. आता आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आणखी एकजण अॅड होणार आहे. तो म्हणजे पोलीसमामा.

महाराष्ट्रात अफवांचे पीक जोमाने वाढत असून याला कारण ठरले आहे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅपवरुन पसरवण्यात येणारे अविचारी फॉरवर्डस मेसेजमुळे अफवा काही क्षणात हजारो लोकांपर्य़ंत पोहचते. व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजची शहानिशा न करता तो काही सेकंदात फॉडवर्ड होतो. पण त्याचे परिणाम काय होतील याचा कोणीच विचार करत नाही. अशाच अफवांचे महाराष्ट्रात बळी गेले आहे. तर काहींना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे.

[amazon_link asins=’B0752ZZ4FX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9f625a4-8072-11e8-95b2-09bcdc24f52b’]

महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या ५० हजार पोलिसांना जास्तित जास्त व्हॉट्सअॅप, फेसबुक ग्रुपमध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीसमामा आपल्या ग्रुपमध्ये असल्याने अॅडमिनपासून ग्रुपमधील मेंबर्सवर मामांची करडी नजर राहणार आहे. आणि जो अफवांचे मसेज पसरवेल त्याची मात्र काही खैर नसेल.

एक अफवा…

व्हॉट्सअॅप वरुन फिरणारी एक अफवा अनेकांना त्रासदायक ठरते. एका अफवेमुळे निष्पाप लोकांना मारहाण झाल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहे. महाराष्ट्रात ११ घटना घडल्या आहे. या घटनांमध्ये ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १६ जण गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने मेसेज फॉडवर्ड करताना थोडासा विचार करुन, मेसेजची खातरजमा करुन मगच तो पुढे पाठवावा. नाही तर आपल्या हातात नवीन तंत्रज्ञान आलं पण ते हातळण्याची अक्कल मात्र आली नाही असेच म्हणावे लागेल.