NPS Calculator | रोज 400 रुपयांच्या बचतीने निवृत्तीनंतर दरमहा होईल 1.80 लाख रुपयांची कमाई; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  NPS Calculator | राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एनपीएस (National Pension System) भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली निवृत्ती लाभ योजना आहे. एनपीएस खात्यात दरमहिना 12,000 रुपये म्हणजे रोज 400 रुपये जमा करून निवृत्तीनंतर दरमहिना 1.80 लाख रुपयांची महिना कमाई करू शकता. तज्ज्ञ यासाठी एनपीएस ग्राहकांना एसडब्ल्यूपी म्हणजे सिस्टमॅटिक विदड्रॉल प्लान वापरण्याचा आणि निवृत्तीनंतर मासिक उत्पन्न वाढवण्याचा (NPS Calculator) सल्ला देतात.

एनपीएसबाबत जाणून घ्या

एनपीएस योजनेवर बोलताना सेबी रजिस्टर्ड टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट जितेंद्र सोलंकी (SEBI registered tax and investment expert Jitendra Solanki) यांनी म्हटले की,
एक एनपीएस खातेदार एनपीएस खात्यात 75 टक्केपर्यंत इक्विटी एक्सपोजर निवडू शकतो.
मात्र, इक्विटी एक्सपोजर 60 टक्के आणि डेट एक्सपोजरवर 40 टक्केवर ठेवणे सर्वात चांगले आहे.

हे त्या एनपीएस ग्राहकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे, ज्यांची जोखीम क्षमता कमी आहे.
60:40 इक्विटी आणि डेट जोखीम ठेवल्याने एनपीएस खातेधारकाला मोठ्या कालावधीत जवळपास 10 टक्के एनपीएस व्याजदर प्राप्त करण्यात मदत (NPS Calculator) मिळेल.

किती करावी लागेल गुंतवणूक

सोलंकी यांच्यानुसार जर कुणी गुंतवणुकदार इक्विटी-डेट एक्सपोजर (equity-debt exposure ratio) 60:40 च्या प्रमाणात ठेवत 30 वर्षासाठी आपल्या एनपीएस खात्यात 12,000 रुपये प्रति महिना गुंतवणूक केली आणि निव्वळ एनपीएस मॅच्युरिटी रक्कमेच्या 40 टक्के एन्युटी खरेदी केली तर त्यास 1.64 कोटी रुपये एकरकमी मिळतील.

54,704 रुपये मासिक पेन्शन एन्युटीच्या रूपात किमान 6 टक्के वार्षिक रिटर्न देईल.
मात्र, काही लोक असेही असतात जे नेट एनपीएस मॅच्युरिटी रक्कमेच्या 50 टक्के रक्कमेची एन्युटी खरेदी करतात.
त्या स्थितीत, एनपीएस कॅलक्युलेटरचा सल्ला आहे की मासिक पेन्शन 68,330 रुपयांपर्यंत जाईल.
तर एकरकमी काढता येणारी रक्कम 1,36,75,952 रूपये होईल.

एसडब्ल्यूपीमध्ये गुंतवणुकीतून असा होईल फायदा

एनपीएस खातेदाराला आपले मासिक उत्पन्न वाढवण्यासाठी एसडब्ल्यूपीमध्ये एकरकमी रक्कमेचा वापर करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत तज्ज्ञांनी म्हटले की,
25 वर्षाच्या कालावधीसाठी 1.36 कोटीच्या गुंतवणुकीसाठी 8 टक्के प्रतिवर्षाच्या अपेक्षित दराने, गुंतवणुकदार दमहिना 25 वर्षासाठी 1,02,464.455 रुपये काढू शकतो.

अशाप्रकारे, जर एनपीएस खातेधारकाने 40 टक्केवर एन्युटी जोखीम ठेवली असेल तर त्या स्थितीत एकरकमी काढता येणारी रक्कम 1.64 कोटी रुपये असेल.

 

हे आहे पूर्ण कॅलक्युलेशन

एसपीडब्ल्यूपीमध्ये 1.64 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास कुणाला किती रक्कम मिळेल याबाबत तज्ज्ञ सांगतात की,
एसडब्ल्यूपीमध्ये 25 वर्षासाठी 1.64 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याने गुंतवणुकदाराला वरील वर्षांसाठी 1,23,560 किंवा 1.23 लाख प्रति महिना काढण्यात मदत होईल.

जर एसडब्ल्यूपी रिटर्न 8 टक्के प्रति वर्ष असेल, तर याचा अर्थ आहे की, जर कुणी व्यक्ती इक्विटी कर्ज जोखीमीला 50:50 च्या प्रमाणात ठेवत 30 वर्षासाठी आपल्या एनपीएस खात्यात प्रति महिना 12,000 रुपये म्हणजे रोज 400 रुपयांची गुंतवणूक केली तर त्यास सुमारे 1.70 लाख प्रति महिना मिळतील म्हणजे वार्षिक रिटर्नच्या रूपात 68,330 रुपये आणि एसडब्ल्यूपीमधून 1.02 लाख रुपये दिले जातील.

 

Web Title : NPS Calculator | nps calculator earning rs 1 80 lakh every month after retirement by saving rs 400 daily know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Air India Story | 46 वर्ष नफ्यात असणारी एअर इंडिया कर्जात कशी बुडाली? जाणून घ्या टोटल स्टोरी

Multibagger Stocks | ‘हा’ 25 रुपयांचा शेयर तुम्हाला करू शकतो लखपती, वर्षभरात 9100 टक्के रिटर्न्स

Kolhapur News | पोलीस ठाण्यातच महिलेशी अश्लील वर्तन; कोल्हापुरातील घटनेने खळबळ