NPS | निवृत्तीनंतर पाहिजे असेल दरमहिना 2 लाख रुपये पगार, तर आवश्यक करा ‘हे’ काम; वृद्धत्वात होणार नाही त्रास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NPS | तुम्हाला निवृत्तीनंतर चांगले नियमित इन्कम पाहिजे का, जर होय तर तुम्हाला एनपीएसमध्ये गुंतवणूक सुरू करावी लागेल. सरकारने प्रथम सरकारी कर्मचार्‍यांसाठी NPS ची सुरूवात केली होती. 2009 मध्ये ती सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा खुली केली. ही सरकारी योजना आहे. तिचे नियम आणि अटी सरकारची संस्था ठरवते. यामुळे तुम्ही विश्वास ठेवू शकतो. (NPS)

 

NPS ची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही योजना ईपीएफ, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजने (EPF, PPF and Sukanya Samrudhi Yojana) प्रमाणे ईईई कॅटेगरीतील (EEE category) गुंतवणुक माध्यमात येते. याचा अर्थ, यामधील गुंतवणूक, इंटरेस्ट आणि मॅच्युरिटीवर कोणताही टॅक्स लागत नाही. मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळणारी एकरकमी रक्कम टॅक्स-फ्री असते.

 

एनपीएसचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये इन्व्हेस्टरला डेट आणि इक्विटी दोन्हीत गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते. गुंतवणुकदार कमाल 75 टक्के पैसे शेअरमध्ये लावू शकतात. उर्वरित पैसे डेटमध्ये लावू शकतात. शेअरमध्ये जास्त गुंतवणुकीची परवानगी असल्याने लाँग टर्ममध्ये मिळणारा रिटर्न वाढतो. कमी वयाचा गुंतवणुकदार जास्त रिस्क घेऊ शकतो. तर 60 टक्के पैसे शेअरमध्ये आणि 40 टक्के डेटमध्ये लावू शकतात.

 

आपण दिर्घ कालावधीत शेअरमधून सरासरी 12 टक्के वार्षिक रिटर्नचा अंदाज लावू शकता. अशाप्रकारे डेटमधून लाँगटर्ममध्ये वार्षिक 8 टक्के रिटर्नची आशा करता येऊ शकते. अशाप्रकारे दोन्हीचा रिटर्न पाहता आपण लाँगटर्ममध्ये सरासरी 10 टक्के रिटर्नचा अंदाज लावू शकता.

लाँगटर्ममध्ये सरासरी 10 टक्के वार्षिक रिटर्न अट्रॅक्टिव्ह आहे. यासाठी कुणी व्यक्ती जेवढ्या लवकर एनपीएसमध्ये गुंतवणूक सुरू करेल,
तेवढा त्याला जास्त फायदा होईल. जर 20 वर्षाच्या वयात एखाद्या इन्व्हेस्टरने एनपीएसमध्ये दरमहिना 5000 रूपये इन्व्हेस्ट करण्यास सुरूवात केली
तर निवृत्तीमध्ये म्हणजेच 60 व्या वर्षी पर्यंत त्याचे पैसे खुप जास्त वाढतील.
एनपीएस कॅलक्युलेटर सांगतो की, मॅच्युरिटीवर त्यास एकरकमी सुमारे 1.91 कोटी रूपये मिळतील. याशिवाय त्यास 1.27 कोटी रूपये एन्यूटीच्या रूपात मिळतील.

 

एन्युटी अमाऊंटचा वापर मंथली पेन्शन मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.
एनपीएस कॅलक्युलेटर सांगतो की, 1.63 कोटी रुपयांच्या एन्युटीवर वार्षिक 6 टक्के रिटर्नच्या हिशोबाने तुम्हाला दरमहिना 63.768 रूपये पेन्शन मिळेल.

 

तुम्ही 1.91 कोटी रूपयांची गुंतवणुक सिस्टमॅटीक विदड्रॉल प्लान (systematic withdrawal plan – SWP) म्हणजे एसडब्ल्यूपीमध्ये करू शकता.
एसडब्ल्यूपी तुम्हाला दरमहिना तुमचे पैसे काढण्याची सुविधा देते. एसडब्ल्यूपीमध्ये दिर्घकालावधीमध्ये किमान 8 टक्के रिटर्नचा अंदाज लावला जाऊ शकतो.
जर 1.91 कोटी रुपये 25 वर्षासाठी एसडब्ल्यूपीमध्ये टाकले तर 8 टक्के रिटर्नच्या हिशोबाने
तुम्हाला दरमहिना 1.43 लाख रूपयांचे मंथली इन्कम होऊ शकतो.

 

अशाप्रकारे 20 वर्षाच्या वयात दरमहिना केवळ 5000 रूपयांची गुंतवणूक एनपीएसमध्ये केल्यास निवृत्तीमध्ये दरमहिना 2 लाख रूपयांचे इन्कम मिळवू शकता.
हे गणित सोपे आहे. दरमहिना 1.43 लाख रुपये तुम्हाला SWP मधून मिळतील.
तर दरमहिना 63,768 रूपये तुम्हाला एन्युटीमधून मिळतील.
तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, 63,768 रूपये मंथली इन्कम तोपर्यंत मिळत राहील,
जोपर्यंत इन्व्हेस्टर जिवंत असेल. SWP मधून मिळणारे 1.43 रूपये दरमहिन्याचे इन्कम केवळ 25 वर्षांसाठी मिळेल.

 

Web Title :- NPS | do you want monthly rupees 2 lakh income after retirement know what will you have to do

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 

Mukesh Ambani News | मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचा दिला राजीनामा, आकाश अंबानी बनले कंपनीचे चेअरमन

 

Maharashtra Political Crisis | “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..! ‘एकनाथ शिंदे आमदार शहाजीबापूंना म्हणाले ‘Once More’