पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा बनवले प्रमुख सचिव, युपीच्या नृपेंद्र मिश्रांची ही आहे गोष्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – 2014 पेक्षा बहुमताने विजयी झाल्यानंतर आता मोदी सरकार आपल्या मोदी 2.0 टीममध्ये नवरत्न भरण्याच्या तयारीला लागले आहेत. यासाठीच मोदी सरकारला आपल्या टीममध्ये असा रत्न हवा आहे की त्या जो मुख्य सचिव पद सांभाळेल. पण मोदी सरकारला असा व्यक्ती हवाय ज्याला केंद्र सरकारमधील कामाचा मोठा अनुभव असेल आणि त्याच्या कार्यावर देखील कोणताही डाग नसेल. तसेच त्याला उत्तर प्रदेशातील संपुर्ण माहिती असेल आणि दिल्लीत बसून उत्तर प्रदेशसाठी रणनीति आखू शकेल.
 
हे आहेत नवे मुख्य सचिव
यासाठी मोदी सरकारने असा रत्न शोधला असून उत्तर प्रदेशातील एका आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आता मोदींनी मुख्यसचिव म्हणून रिटायर्ड आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांची नेमणूक केली आहे. उत्तर प्रदेशच्या मधील 2  मुख्यमंत्र्यासोबत त्यांनी आता पर्यंत काम केले आहे. ज्यानंतर ते 2014 साली पंतप्रधानांचे मुख्य सचिव झाले. 
नृपेंद्र मिश्रा यांचे नाव त्या अधिकाऱ्यांमध्ये  घेतले जाते ज्यांना विना गुजरात कनेक्शन मोदी सरकारमध्ये एवढे मोठे पद मिळाले आहे. मागील कार्यकाळात मोदी सरकारचा विश्वास जिंकल्यानंतर यांना या वेळी देखील पुन्हा एकदा मुख्य सचिव हे पद सोपवण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि सचिवालय यांच्या मधील मुख्य दुवा म्हणून ते काम करणार आहेत.

नृपेंद्र मिश्रा यांना मुख्य सचिव बनवण्यासाठी केला नियमात बदल

रिटायर झाल्यानंतर आता नृपेंद्र मिश्रा 2006 ते 2009 या काळात ट्रायचे अध्यक्ष होते. नियमानुसार ट्रायचे अध्यक्ष पद भूषवणारा अधिकारी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणतेही पद ग्रहण करु शकत नाही. हा नियम मिश्रा यांच्या पदधारण करण्यात अडचणी निर्माण करत असल्याने अखेर मोदी सरकारने त्या नियमात संशोधन करुन त्याच्या प्रमुख सचिव बनण्यातील अडथळा दूर केला. यावरुन मोदींचा त्याच्या प्रती असलेला विश्वास सिद्ध होतो.