Coronavirus : देशात ‘कोरोना’बधितांचा आकडा 17.50 लाखांच्या पुढं, गेल्या 24 तासात 54 हजारपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. देशात कोरोनाने संक्रमित रूग्णांनी आज साडेसतरा लाखांचा आकडासुद्धा पार केला. मागील 24 तासात कोरोनाची 54 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली. या नव्या केस सापडल्यानंतर देशात आतापर्यंत कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 17 लाख 50 हजार 723 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यानुसार, मागील 24 तासात 54 हजार 735 रूग्ण वाढले. या दरम्यान, 853 लोकांनी आपला जीव गमावला. तर यापूर्वी शुक्रवारी 57, 118 केस समोर आल्या होत्या आणि 764 लोकांचा मृत्यू झाला होता.

देशात कोरोनाच्या आता 5 लाख 67 हजार 730 अ‍ॅक्टीव्ह केस आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 37 हजार 364 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 लाख 45 हजार 629 लोक बरे झाले आहेत. कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट 64.44% झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वात जास्त महाराष्ट्र प्रभावित असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात रोज 9 हजारपेक्षा जास्त कोविड-19 केस समोर येत आहेत. शनिवारी सुद्धा येथे 9601 प्रकरणे समोर आली आणि या दरम्यान 322 रूग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात आतापर्यंत एकुण 4,31,719 लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत. यामध्ये 2,66,883 लोकांनी कोरोनावर मात केली आहे आणि 1,49,214 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 15,316 लोकांचा मृत्यू झाला आहे.

चेन्नईत कोरोना रूग्णांची संख्य 1 लाखाच्या पुढे
चेन्नई आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बर्‍यापैकी बचावली होती, तेथे सुद्धा शनिवारी कोरोना रूग्णांच्या संख्येने एक लाखाचा आकडा पार केला आहे. शनिवारी येथे 1,074 प्रकरणांसह एकुण प्रकरणे 1,00,877 झाली आहेत. शहरात एकुण प्रकरणांपैकी , 86,301 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत 2,140 मृत्यू नोंदले गेले आहेत.

गुजरातमध्ये कोविड-19 ची 1,136 नवी प्रकरणे
गुजरातमध्ये शनिवारी कोविड-19 ची एका दिवसात 1,136 नवी प्रकरणे समोर आली, ज्यामुळे राज्यात एकुण संक्रमितांची संख्या वाढून 62,574 पेक्षा जास्त झाली आहे. यशिवाय मागील 24 तासात संक्रमणामुळे आणखी 24 रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानुसार 24 तासात कोविड-19 च्या आणखी 24 रूग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यात मृतांची संख्या वाढून 2,465 झाली आहे. 875 रूग्णांना मागील 24 तासात डिस्चार्ज देण्यात आला आहे, ज्यामुळे राज्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 45,782 झाली आहे.

हरियाणात 24 तासात आल्या कोरोनाच्या 793 नव्या केस
हरियाणामध्ये शनिवारी कोविड-19 मुळे आणखी 7 लोकांचा मृत्यू झाला. तर संक्रमणाची 793 नवी प्रकरणे समोर आल्याने राज्यात संक्रमितांची संख्या 35,758 पर्यंत पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार, फरीदाबादमध्ये तीन मृत्यू झाले. तर गुडगावमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुरुक्षेत्रमध्ये दोन आणि पानीपतमध्ये एका रूग्णाचा मृत्यू झाला. यासोबत, हरियाणामध्ये कोविड-19 मुळे जीव गमावणार्‍या लोकांची संख्या 428 झाली आहे, ज्यापैकी 134 आणि 124 मृत्यू अनुक्रमे फरीदाबाद आणि गुडगाव जिल्ह्यात झाले आहेत.