Nupur Sanon | क्रिती सेनॉनची बहिण नुपूर सेनॉनही करणार बॉलीवुडमध्ये पदार्पण; ‘या’ बीग बजेट चित्रपटातून करणार दमदार एंट्री

पोलीसनामा ऑनलाइन – सिनेविश्वामध्ये अनेक नवनवीन कलाकारांचे आगमन होत आहे. लवकरच अभिनेत्री क्रिती सेनॉनची बहिण (Kriti Sanon sister) अभिनेत्री व गायक नूपुर सेनॉन (Nupur Sanon) ही बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे. नुपूर ही ‘टायगर नागेश्वर राव’ (Tiger Nageshwar Rao) या चित्रपटमधून बॉलीवुडमध्ये दमदार एंट्री करणार आहे. हा एक बीग बजेट चित्रपट असून तो पॅन इंडिया प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. अभिनेत्री नूपुर (Nupur Sanon) हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

अभिनेत्री नुपूर सेनॉन ही अनेक दिवसांपासून तिच्या पदार्पणामुळे (Nupur Sanon Bollywood Debut) चर्चेत आहे. ती लवकरच दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता रवि तेजा (Ravi Teja) सोबत ‘टायगर नागेश्वर राव’ या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. हा नूपुर चा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले असल्याचे तीने स्टोरी शेअर करत सांगितले. तिने लिहिले की, “ही माझी काम पूर्ण करण्याची वेळ आहे. मी आता लवकरच निवांत झोपेन.. आनंद आणि शांततेने.”

‘टायगर नागेश्वर राव’ चित्रपटाचे दिग्दर्शन वामसी कृष्णा नायडू (Vamsi Krishna Naidu) व वंशी कृष्णा (Vanshi Krishna) यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अभिषेक अगरवाल (Producer Abhishek Agarwal) यांनी केली आहे. ‘टायगर नागेश्वर राव’ हा चित्रपट 1970 च्या दशकातील स्टुअर्टपुर येथील लोकांच्या वास्तविक घटनांवर आधारित एक पिरियोडिक चित्रपट आहे. चित्रपटाचा टीझर (Tiger Nageshwar Rao Teaser Out) काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, त्याला प्रेषकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटामध्ये नूपुर सेनॉन बरोबरच जॉन अब्राहम (John Abraham), गायत्री भारद्वाज (Gayatri Bhardwaj) हे कलाकार झळकणार आहे. या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी ‘टायगर नागेश्वर राव’ चित्रपट प्रेक्षकांच्या (Tiger Nageshwar Rao Release Date) भेटीस येणार आहे.

नुपूर सेनॉन (Nupur Sanon) सोशल मीडियार सक्रीय असून ती तिच्या लाईफ अपडेट तिथे शेअर करत असते.
अभिनेत्री नुपूरचा पदार्पणापूर्वीच मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून तिचे इंस्टाग्रावर 8.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.
नुपूर ही अनेकदा आपले हॉट फोटोशूट (Nupur Sanon Hot Photoshoot) सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिच्या या फोटोवर चाहते कमेंटस् पाऊस पाडत असतात. लवकरच ती ‘टायगर नागेश्वर राव’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Web Title :  Nupur Sanon | tiger nageshwar rao nupur sanon wraps up shooting for ravi tejas tiger nageshwar rao set to release in cinemas on october 20th

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Monsoon Session | शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन बाळासाहेब थोरात- देवेंद्र फडणवीस आमनेसामने, विरोधकांची घोषणाबाजी

Pune Crime News | अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्‍या ‘मजनू’ला दाखविली कोठडी

Parineeti Chopra And Raghav Chadha | परिणीती व राघव चड्ढा यांनी लग्नाआधी घेतला मोठा निर्णय

Siddharth Jadhav | लाखो रुपये कमवणाऱ्या सिद्धार्थ जाधवची ‘ही’ होती पहिली कमाई