डॉक्टरचा नर्सवर बलात्कार, पोलिसांकडून डॉक्टरला अटक

हैद्राबाद : वृत्तसंस्था – एका डॉक्टरला नर्सवर अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार हैद्राबाद येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नर्स महिलेने पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. ही महिला ३० वर्षीय असून ही नर्स महिला चंद्रयानगुप्त भागात एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते.

ही महिला नर्स काम करत असलेल्या रुग्णालयाच्या डॉक्टर एमए अलीमूद्दीन यांच्या बरोबर तिची ओळख झाली. त्याचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. डॉक्टराने लग्नाचे वचन दिल्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. या बाबतची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसाने हा डॉक्टर त्या महिला नर्सकडे दुर्लक्ष करु लागला. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु लागला, ती महिला नर्स त्या डॉक्टराकडे विचारणा करु लागली आणि लग्नास नकार देऊ लागला.

पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार या महिलेने सांगितले की, डॉक्टरांनी माझ्याशी विवाह करण्याचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले होते. परंतू आता तो दुर्लक्ष करत आहे. ही तक्रार हैद्राबादमधील चंद्रयानगुप्त पोलिसांनी कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पोलिसांकडून आरोपीला बुधवारी ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयीन कोठडीत देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –