परिचारिका, गर्भवती माता प्रशिक्षण शिबीर

परतूर (जालना) : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील ग्रामीण भागातील गरोदर महिला या उपचारासाठी आरोग्य उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात. जोखमीच्या महिलांना उपचारासाठी तत्काळ प्राथमिक केंद्रावरून तालुका आणि जिल्हास्तरावरील सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला द्यावा असे आवाहन डॉ. संध्या कराड यांनी दिला. तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिचारिका व माता बालसंगोपन प्रशिक्षण शिबिरात बोलत त्या होत्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी.बी. मोरे, डॉ. सय्यद हे उपस्थित होते.

डॉ. कराड पुढे म्हणल्या की, महिलामध्ये रक्त घटकाची कमतरता असणे, लसीकरण, रक्तदाब वाढलेले रुग्ण शोधून त्यांना संदर्भ सेवेसाठी पुढील उपचारासाठी पुढे पाठवणे गरजेचे आहे. गरोदर मातासाठी आहाराचे महत्त्व व त्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. आहारामुळे सदृढ बालकास जन्म होण्यासाठी मदत होते. महिलांना गरोदरपणात तीन सोनोग्राफी करणे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे जन्मजात दोष ओळखण्यासाठी अनोमाली स्कॅन करणे आवश्यक आहे. यासाठी परिचारिका यांनी महिलाना मार्गदशन करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील परिचारिका उपस्थित होत्या.