‘ईदला मला ‘जय श्रीराम’चे मेसेज येतात’ : अभिनेत्री खा. नुसरत जहाँ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीएमसी खासदार नुसरत जहाँ लोकसभा निवडणुकीनंतर सतत चर्चेत आहेत. नुसरत नेहमीच विवादात सापडताना दिसतात. जैन परिवारात लग्न करण्यापासून तर रथ यात्रेत हिंदू रितीरीवाजात भाग घेण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत ज्यांची खूपच चर्चा झाली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुसरत जहॉंंनी बशीरहाट हिंसा, टीएमसीवर अल्पसंख्यांकाच्या बाबतीत पक्षपाताचा आरोप, लिंचिंग आणि जय श्री राम यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. याशिवाय ट्रोल्सचा कशा प्रकारे सामना करतात हेही त्यांनी सांगितले आहे. पाच वर्षांची योजना काय हेही त्यांनी सांगितले आहे.

मी नेता होण्यासाठीच बनले आहे
एवढ्या कमी वयात खासदार झाल्यानंतर कसं वाटत आहे हे विचारल्यावर नुसरत जहाँ म्हणाल्या, “टीएमसीच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत मला सुखद धक्का बसला होता. परंतु मला आता असे वाटत आहे की, मी नेता होण्यासाठीच बनले आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी आता शिकत आहे.”

काय घालायचं आणि कोणाशी लग्न करायचं हा माझा प्रश्न आहे
कपड्यांपासून ते ट्रोलिंगच्या मुद्द्यावर बोलताना नुसरत म्हणाल्या, “मला ट्रोलर्सला महत्त्व द्यायचे नाही. त्यामुळे मी त्यांना उत्तर दिले नाही. कपडे आणि लग्न ही माझी व्यक्तीगत पसंती आहे. सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं की, मी खासदार आहेच सोबत एक माणूसही आहे. काय घालायचं आणि कोणाशी लग्न करायचं ही माझी पसंती आहे.”

अल्पसंख्यांकांसाठी काम करणं भेदभाव नाही
टीएमसीकडून अल्पसंख्यांकाच्या भेदभावाबाबत बोलताना नुसरत म्हणाल्या, “अल्पसंख्यांकांसाठी काम करणं भेदभाव कसा असू शकतो हे मला नाही माहीत.” टीएमसी ही धर्मनिरपेक्ष पार्टी असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे त्या म्हणाल्या, “मला कोणी ना रथ यात्रेत जायला सांगितलं ना ही कोणी सिंदूर लावायला सांगितलं.”

ईदला येतात जय श्रीरामचे मेसेज
लोकांकडून जबरदस्तीने जय श्रीराम म्हणवल्या जाण्याच्या वृत्तांवर नुसरत म्हणाल्या, “देवाचं नाव घेणं आणि धार्मिक नारे देणं यात काहीच चुकीचं नाही. धर्म व्यक्तीच्या ओळखीतील महत्त्वाचा भाग असतो. त्याला व्यक्त करणे स्विकार्य असायला हवं. परंतु याला घेऊन जोरजबरदस्ती करणं किंवा उचकवणं चुकीचं आहे. ईदलाही मला हजार असे मेसेज येतात ज्यात जय श्रीराम लिहिलेलं असतं. परंतु मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. याला उत्तर दिल्याने अशा प्रकारच्या सांप्रदायिक तिरस्काराला आणखी प्रोत्साहन मिळते.”

आरोग्यविषयक वृत्त –

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या