पतीच्या ‘त्या’ प्रश्नावर खा. अभिनेत्री नुसरत जहाँ म्हणाल्या, ‘तुमच्याकडून ‘या’ प्रश्नाची अपेक्षा नव्हती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नेहमीच चर्चेत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नुसरत यांनी बिजनेसमन निखिल जैनसोबत लग्न केलं. सोशलवरही नुसरत नेहमी चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. निखिल जैन आणि नुसरत यांनी नुकतीच आपकी अदालत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी निखिलला नुसरत यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. दोघांनी मनमोकळेपणाने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

‘तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती’ : नुसरत जहाँ

जेव्हा आपकी आप की अदालतमध्ये निखिल जैन यांना नुसरत यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी विचारले की, “कुटुंब आणि आतापर्यंत तू जशी लाईफस्टाईल जगत आलीस ती लाईफस्टाईल यापैकी एक निवडायचं असेल तर काय निवडशील?” पती निखिल यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना नुसरत जहाँ म्हणाल्या की, “तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. परंतु मझ्यासाठी कुटुंब हे प्राधान्य असेल. कुटुंबाचा विस्तार होत आहे. परिवारही मोठा होत आहे. मला सर्व गोष्टींमध्ये संतुलन राखायचे आहे. यामध्ये तुम्हालाही माझी मदत करावी लागेल.”

https://www.instagram.com/p/Bz-DRt1H65D/?utm_source=ig_embed

‘टीकटॉक व्हिडीओ बनवण्यात गैर काय ?’ : नुसरत जहाँ

काही दिवसांपूर्वी नुसरत आणि खासदार मिमी चक्रवर्ती यांनी टीकटॉक व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता. नुसरत यांनी यावेळी बोलताना सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबतही आपलं मत मांडलं. नुसरत म्हणाल्या की, “टीकटॉक व्हिडीओ तरुणाईला खूप आवडतं. जर आम्ही एखादा व्हिडीओ बनवला तर त्यात गैर काय आहे?” असा सवालही नुसरत यांनी केला. यावेळी संसदेबाहेरील एका फोटोबाबत बोलताना मिमी चक्रवर्ती म्हणाल्या की, “संसदेबाहेर फोटो काढून आम्ही कोणताही नियम मोडला नाही.”