OBC reservation | पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाल्या – ‘…तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरुन भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ( BJP leader Pankaja Munde) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकार ओबीसींची (OBC) बाजू मांडू शकले नाही म्हणून आरक्षण रद्द झाल आहे. त्यामुळे आता मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची काय गरज आहे? त्यांनी निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांनी तत्काळ निर्णय करावा. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. आम्ही न्यायालयातही जाऊ असा इशारा देत मुंडे यांनी 26 जून रोजी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. obc reservation in maharashtra pankaja munde said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे Pankaja Munde म्हणाल्या, हा केवळ भाजपचा (BJP) विषय नाही तर सर्वच पक्षातील ओबीसी नेत्यांचा हा विषय आहे.
आम्ही ओबीसींच्या हितासाठी काहीही करायला तयार आहोत.
मंत्र्यांना, सरकारला भरपूर अधिकार असतात. त्यावेळी आमच्याकडे निर्णयक्षमता होती.
योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती.
त्यामुळे आम्ही हे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी पावल टाकली, अध्यादेश काढले.
या सरकारची मानसिकता तशी नाही. त्यामुळे तो अध्यादेश बाद झाला.
कोरोनांमुळे इम्पिरिकल डाटा गोळा करणे हे विधान मला मान्य नाही.
मला वाटते की, कोरोना असतानाही अनेक गोष्टी सुरू आहेत. जशा बाकीच्या गोष्टी सुरु आहेत.
मग इम्पिरिकल डाटाच्या (Imperial data) बाबतीत का नाही करू शकत? त्यामुळे दोन्हींचा संबंध लावणे अयोग्य आहे. आम्ही मंत्री म्हणून हा विषय हाताळला आहे.
आम्ही काही सूचना करू शकतो. राज्याच्या हिताचा निर्णय घेत असताना सरकार समिती गठीत करतं.
त्यात सूचना घेण्यात अडचण काय. मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. बघू पुढे काय होतं? असे मुंडे म्हणाल्या.

 

Web Title : obc reservation in maharashtra pankaja munde said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Parab ! पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, पण..

OBC Reservation | सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती

Ajit Pawar | बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांचा लाठीचार्ज, मराठा आंदोलक ताब्यात