OBC Reservation | जालन्यात आज भुजबळांच्या उपस्थितीत आरक्षण बचाव एल्गार सभा, सत्ताधारी-विरोधक ओबीसींच्या पाठीशी

जालना : OBC Reservation | मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देण्यास मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केल्यानंतर सर्व ओबीसी नेते एकवटले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजू छगन भुजबळ आणि ओबीसींच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. आज मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या जालन्यातच ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव एल्गार सभा होत आहे. या सभेला भाजपा (BJP), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) अशी दोन्हीकडील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे. सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची धग जालना येथील मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणानंतर वाढली. आज याच ठिकाणाहून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेते ओबीसींसाठी एकत्र येत असल्याचे दिसत आहेत.

जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण ( OBC Reservation) बचाव एल्गार सभा होत असून ओबीसींच्या हक्कासाठी ही सभा असल्याचे सांगण्यात आले आहे. या सभेला राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.

जालन्यातील अंबडमध्ये होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेला मंत्री छगन भुजबळ,
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde),
रासपचे महादेव जानकर (Mahadev Jankar), शब्बीर अन्सारी,
आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar)
यांच्यासह प्रमुख नेते उपस्थिती राहणार आहेत. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पाणी, अल्पोपहार, वाहनतळ अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

जालन्याच्या ओबीसी सभेसाठी १२०० पोलिस कर्मचारी, २०० अधिकारी, एसआरपीएफच्या तीन कंपन्या,
रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची एक कंपनी, क्विक अ‍ॅक्शन टीम, ९ स्ट्रायकिंग फोर्स असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
तसेच सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सभेसाठी पोलिस दल अलर्ट झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

प्रकाश शेंडगेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचे स्पष्टीकरण, म्हणाले – ”छगन भुजबळांना पाडायचे आमच्या…”