विरप्पनला यमसदनी धाडणारा अधिकारी ‘मिशन काश्मीर’च्या कामावर

श्रीनगर: वृत्तसंस्था

भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर कोसळलं. त्यानंतर त्या ठिकाणी राज्यपाल शासन लागू करण्यात आलं आहे. नुकतीच राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी राज्याची सुत्रं हाती घेतली आहेत. एकंदर राज्याची अस्थिर परिस्थिती पाहता, वाढत्या दहशतवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी सरकारने हालचाली वाढवल्या आहेत.

दहशतवाद्यांच्या वाढत्या हालचालींना आळा घालण्यासाठी सरकारने जम्मू काश्मीरमध्ये धाडसी अधिकारी आणण्याचा निर्णय घेतला आहे.  छत्तीसगड केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्त केलं आहे. तर राज्यपालांचे सल्लागार म्हणून आयपीएस विजय कुमार यांना नेमलं आहे. हे दोन्ही अधिकारी आपापल्या खात्यातील कडक, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात.

पाहा नेमकं कोण आहेत विजयकुमार 

एकेकाळी आपल्या देश विघातक कारवायांच्या जोरावर  दक्षिणेत दहशद निर्माण करणाऱ्या विरप्पनला यमसदणी धाडण्याचे काम विजयकुमार यांनी केलं आहे. चंदनासह हत्तीच्या तस्करी आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्यामुळे विरप्पन प्रकाशझोतात आला होता. एवढेच नाही तर सरकारने त्याला पकडण्यासाठी 20 कोटीचा खर्च केला होता. अशा कुख्यात दरोडेखोराला आयपीएस विजयकुमार यांनी आॅपरेशन कोकून अंतर्गत 10 आॅक्टोबर 2004 रोजी ठार केलं होते. या विषयावर त्यांनी एक पुस्तकही लिहिलं आहे.

1975 मध्ये तामिळनाडू केडरमधून आयपीएस

स्पेशल सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपल्या सेवेला सुरूवात

स्पेशल टास्क फोर्समध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्यावर विरप्पनला मारण्याची जबाबदारी

विरप्पनला जोपर्यंत मारणार नाही तोपर्यंत डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ त्यांनी बन्नारी अम्मान मंदिरात घेतली होती

‘वीरप्पन चेंजिंग द ब्रिगांड’ हे पुस्तक विजय कुमार यांनी लिहिलं आहे.