Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना सुरू करण्यावर निर्णयाची अपेक्षा, संसदेत मंत्र्यांनी सांगितले कुठे अडकले प्रकरण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था | सरकार काही केंद्रीय कर्मचार्‍यांना New Pension Scheme (NPS) मधून Old Pension Scheme (OPS) मध्ये आणू शकते. या कर्मचार्‍यांमध्ये त्या लोकांचा समावेश होईल, ज्यांच्या भरतीसाठी जाहिरात 31 डिसेंबर 2003 ला किंवा त्यापूर्वी जारी करण्यात आली होती. याची चर्चा सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) एक आदेश आल्यानंतर सुरू झाली. (Old Pension Scheme)

विभागाकडून मागितला सल्ला

फायनान्स मिनिस्ट्रीचे राज्यमंत्री डॉ. भगवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी राज्यसभेत सांगितले की, पेन्शन (Pension) आणि पेन्शनधारक कल्याण विभागाला (DoP&PW) केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना (सिव्हिल, संरक्षण आणि रेल्वे पेन्शनधारक) निवृत्ती लाभाच्या बाबत (Old Pension Scheme) समन्वयासाठी पॉलिसी तयार करण्याचे काम सोपवले आहे. विभागाकडून याबाबत लवकरच निर्णय घेण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे.

एनपीएसच्या बाहेर काढण्याची शिफारस

राज्यमंत्र्यांना विचारण्यात आले होते की, DoP&PW ने केंद्र सरकारच्या त्या कर्मचार्‍यांना NPS च्या बाहेर काढण्यासाठी आर्थिक सेवा विभागाचे (DFS) मत मागवले आहे, ज्यांच्या भरतीसाठी जाहिरात 31 डिसेंबर 2003 ला किंवा त्या अगोदर जारी करण्यात आली होती.

कारण सुप्रीम कोर्ट आणि दुसर्‍या हायकोर्टाचे विविध निर्णय पाहता अशा कर्मचार्‍यांना जुन्या पेन्शन योजनेंतर्गत कव्हर करण्याची बाब आली आहे. त्यांना हे सुद्धा विचारण्यात आले होते की, डीएफएसने वरील अधिकार्‍यांना एनपीएसच्या कक्षेबाहेर काढण्याची शिफारस केली आहे का? दरम्यान, संसदेत याविषयावर यापूर्वी सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा