Old Pension Scheme | पुण्यात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर, मध्यवर्ती शासकीय इमारतीसमोर निदर्शने

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. या संपात पुण्यातील कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आज मध्यवर्ती शासकीय इमारतीसमोर निदर्शने केली. या संपात ६० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे अध्यक्ष मारुती शिंदे यांनी दिली. (Old Pension Scheme)

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुण्याचे अध्यक्ष मारुती शिंदे यांनी म्हटले की, महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचार्‍यांवर अन्याय केला आहे. जुनी पेन्शन योजना सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही मान्य न झालेली नाही. त्यामुळे संप पुकारला आहे. (Old Pension Scheme)

दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक
विचार करत असल्याची माहिती दिली. तसेच काल यासंदर्भात झालेल्या उच्च स्तरीय बैठकीची माहिती देखील
मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Job Fair | दत्ताभाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रोजगार मेळावा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भुजबळांवर थेट आरोप, जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्याचा ‘हा’ प्रयत्न

Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने धनकवडी येथील तरुणीची आर्थिक फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीचा काटा काढण्यासाठी आधी विषप्रयोग, नंतर दिली सुपारी; पोलीस तपासात पत्नीचे कारनामे आले समोर