Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीचा काटा काढण्यासाठी आधी विषप्रयोग, नंतर दिली सुपारी; पोलीस तपासात पत्नीचे कारनामे आले समोर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आकुर्डी परिसरात एका घरात घुसून एकाला मारहाण केली. तुमको अभी छोडेंगे नाही, तुमको मार डालेंगे असे म्हणत एकावर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (PCPC Police) दोघांना अटक केली आहे. हि घटना आकुर्डी येथील पंचतारानगर येथे गुरुवारी (दि.7) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीनेच पतीचा काटा काढण्यासाठी सुपारी दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या महिलेने आधी पतीवर विषप्रयोग केला होता. मात्र त्यात यश न आल्याने तिने पतीच्या हत्येची सुपारी दिली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पतीला वंशाला दिवा हवा होता, मात्र सलग आठ मुली जन्मल्या. त्यामुळे पतीने महिलेसोबत वाद घालत होता. त्यामुळे पत्नी वैतागली होती. त्यामुळे तीने पतीचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी सुरुवातीला पतीवर विषप्रयोग केला. मात्र त्यात तिला यश आले नाही. त्यानंतर तिने शेजारीच राहणाऱ्या शिवम दुबे आणि अमन पुजारी यांना पाच लाखांची सुपारी दिली. यावेळी दोन लाख रुपये रोख देखील दिले. यानंतर दोघांनी पतीवर हल्ला केला. मात्र, यात देखील पती बचावला. या हल्ल्याचा पोलिसांनी तपास केला असता या सर्व प्रकरणात पत्नीच मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

आरोपी महिलेकडून सुपारी घेतल्यानंतर शिवम दुबे आणि अमन पुजारी यांनी तिच्या पतीवर हल्ला केला.
यावेळी त्याची हत्या करायची होती, पण त्यात तो वाचला. दरम्यान, वडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुलीने याबाबत
निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली. मात्र, वडिलांवरील हल्ल्यामागे आपल्याच आईचा हात
असेल याची तिला पुसटशी कल्पनाही नव्हती. पुढे पोलिसांची तपास चक्र हलली आणि आठ तासात आरोपींना अटक केली.
आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर या घटनेमागील प्रमुख सुत्रधार पत्नीच असल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी पत्नीसह दोघांना अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भुजबळांवर थेट आरोप, जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्याचा ‘हा’ प्रयत्न

Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने धनकवडी येथील तरुणीची आर्थिक फसवणूक