BirthdaySpecial : 14 व्या वर्षीच ओम पुरींनी 41 वर्षांनी मोठ्या कामवालीशी ‘सेक्स’, ‘मामी’लाही केला होता स्पर्श !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार ओम पुरी आपली अ‍ॅक्टींग आपल्या आवाजासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. भूमिका लहान असो वा मोठी आपल्या अ‍ॅक्टींगची छाप ते सोडतच असत. त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक कॉंट्रोव्हर्सी आहेत. अनेक किस्से आहेत ज्यामुळे तुम्ही अवाक होऊ शकता. आज म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी त्यांची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. जाणून घेऊयात ओम यांचे काही वादग्रस्त किस्से.

ओम पुरी यांची पत्नी नंदिता यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव होतं ‘अनलाइकली हिरो : ओम पुरी’. यात त्यांनी ओम यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचे खुलासे केले आहेत. ओम पुरींचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियाणाच्या अंबाला शहरात झाला होता. त्यांचे वडिल रेल्वेत नोकरीला होते. त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ इथेच गेला. कुटुंबाचा उदरनिर्वाह मोठ्या मुश्किलीने सुरु होता.

ओम यांना रेल्वेची खूप ओढ होती. ते रात्री कोणत्याही रेल्वेच्या डब्यात जाऊन झोपत असत. त्यांनी विचार केला होता की, ते मोठे होऊन रेल्वे ड्रायव्हर बनतील. या दरम्यान ओमची आई त्यांना घेऊन पटियालातील आपल्या माहेरी सन्नौरला गेली होती.

om

नंदिता यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे की, ओम जेव्हा मामाच्या घरी गेले होते तेव्हा ते अवघ्या 14 वर्षांचे होते. त्यावेळीच त्यांनी त्यांच्या घरी कामाला असलेल्या 41 वर्षीय महिलेसोबत सेक्स केला होता. ती महिला त्यांचं पहिलं प्रेम होती. ओम यांचा आणखी एक किस्सा आहे. एकदा ओम आपल्या मामाच्या कुटुंबासोबत टेरेसवर झोपले होते. तेव्हा ओम यांनी आपल्या मामीलाही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

या घटनेनंतर ओम जेव्हा सकाळी उठले तेव्हा मामा त्यांना वेगळ्याच पद्धतीने त्यांच्याकडे बघताना दिसले. काही न बोलताच जोरात गालात लगावली आणि ओमला त्यांनी घरातून बाहेर काढलं.

ओम पुरी यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, 1976 साली आलेल्या घाशीराम कोतवाल या मराठी सिनेमातून त्यांनी डेब्यू केला होता. त्यांनी फिर हेरा फेरी, तमस, ढोल, ट्युबलाईट, द गाजी अटॅक, लंडन ड्रीम्स, सिंग इज किंग, चुप चुपके यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B3wLNeFB-kP/

https://www.instagram.com/p/B3v8xiUpUB7/

Visit : policenama.com