OMG 2 | ‘ओएमजी 2’ चित्रपटावर सेंसर बोर्डचा आक्षेप; सेंसर सर्टिफिकेट देण्यास नकार

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता अक्षय कुमार याच्या आगामी ‘ओएमजी 2’ (OMG 2) चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. काही दिवसांपूर्वी ‘ओएमजी 2’ चित्रपटाचा टीझर (OMG 2 Teaser Out) सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. टीझर आऊट होताच तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. चित्रपटामध्ये अक्षय कुमारने (Akshay Kumar) साकारलेली भगवान शिव यांची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. येत्या 11 ऑगस्टला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असे सांगितले गेले असले तरी चित्रपटाला अद्याप सेंसर बोर्ड सर्टिफिकेट (Censor Board Certificate) दिलेले नाही. ‘ओएमजी 2’ चित्रपटाला सेंसर बोर्डच्या रिव्ह्यु टीमकडे परत पाठवण्यात आले होते. मात्र या टीमने देखील चित्रपटावर आक्षेप नोंदवला असून ‘ओएमजी 2’ (OMG 2) चित्रपटाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

मागील काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये बॉलीवुडच्या आगामी चित्रपटांबाबत (Bollywood Upcoming Movie) उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक सुपरहिट चित्रपटाचे सिक्विल या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्येच 2012 साली प्रदर्शित झालेल्या ओएमजी चित्रपटाचा (Oh My God Movie) सिक्विल देखील निर्मित करण्यात आला आहे. मात्र ‘ओएमजी 2’ चित्रपट सेंसर बोर्डच्या विळख्यात सापड़ला आहे. याआधी बोर्डाच्या ‘एक्जामिंनिंग कमिटीने चित्रपटावर आक्षेप (Censor Board Objections On OMG 2) घेतला होता. त्यानंतर चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी ‘रिव्ह्यु टीम’ कडे पाठवण्यात आला आहे. मात्र आता रिव्ह्यू टीमकडून देखील आक्षेप नोंदवला आहे.

सेंसर बोर्डकडून ‘ओएमजी 2’ चित्रपटाला सर्टिफिकेट (OMG 2 Censor Board Certificate) मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. चित्रपटाच्या माध्यामातून समाजामध्ये कोणाच्या भावना दुखावणार नाहीत व तेढ वाढणार नाही याची काळजी बोर्ड घेत असते. ‘ओएमजी 2’ चित्रपट हा फक्त देवधर्मावर अवलंबून नसून तर लौगिंक शिक्षणावर देखील आधारित (OMH 2 Story) आहे. सेक्स एजुकेशनवर आधारित या चित्रपटाच्या बाबतीत बोर्ड खूप सावधगिरी बाळगताना दिसत आहे. रिव्ह्यू कमेटीने चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटामध्ये 20 सीनला कट्स देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच चित्रपटाला A सर्टिफिकेट (Censor A Certificate) देण्याचा सल्ला बोर्डला दिला आहे. मात्र चित्रपट निर्मात्यांना A सर्टिफिकेट नको आहे. A सर्टिफिकेट मिळालेल्या चित्रपटांना फक्त 18 वर्षांवरील प्रौढ व्यक्तीच चित्रपट पाहू शकतात. बोर्डाच्या या म्हणण्यावर ओएमजी 2 चित्रपटाच्या निर्मात्यांना लवकरच सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे मांडायचे आहे.

‘ओह माय गॉड 2’ (Oh My God 2 Movie) चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस (OMG 2 Release Date)
येईल अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र सेंसर बोर्डाच्या जाळ्यात चित्रपट अडकल्यामुळे ‘ओएमजी 2’ चित्रपट
पूर्वघोषित तारखेला चित्रपट प्रदर्शित करु शकणार नाही असे चित्र दिसत आहे. ‘ओएमजी 2’ (OMG 2) चित्रपटामध्ये
अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अरुण गोविल (Arun Govil), अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)
प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय (Amit Rai) यांनी केले असून
निर्मिती व्हायाकॉम इंडियाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2000 रुपये लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Population Of Pune | पुणे शहराची लोखसंख्या 2047 पर्यंत पोहोचणार 1 कोटींवर !
पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे