घबाड बाळगणार्‍या तहसीलदाराला ‘विसरा’ ! खजिनदाराच्या घरात मोठ-मोठ्या पेट्यात सापडलं सोनं-चांदी, ‘मोजदाद’ करून पोलिसांना लागला ‘दम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनंतपूरच्या कोषागार विभागाच्या कर्मचाऱ्याकडे ट्रंकच्या ट्रंक भरून सोन्या चांदीचे दागिने, भांडी सापडली आहेत. ही सर्व स्थिती पाहता छाप्यासाठी गेलेल्या पोलिसांचेही डोळे विस्फारले आहेत. काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरात घबाड सापडलं होतं. त्या तहसीलदारालाही या कर्मचाऱ्यानं मागं टाकलं आहे.

पोलिसांनी छाप्यानंतर सदर खजिनदार कर्मचाऱ्याकडून मोठ्या संख्येत सोने, चांदी, रोख रक्कम, एफडी, पैसै दिल्याचा वादा केलेले कागदपत्र, कार आणि महागडी बाईक यांच्यासह इतर संपत्ती जप्त केली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, हे घबाड मनोज कुमार याच्या बंगल्यात सापडलं आहे. मनोज ट्रेजरी विभागात वरिष्ठ सहाय्यक आहे. मनोज कुमारनं हे सारं त्याचा ड्रायव्हर नागालिंगा याच्या काकाच्या खोलीत लपवलं होतं.

पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा त्याच्या घरात मोठं मोठे ट्रंक सापडले. यात सोने, चांदी, आणि रोख रक्कत सापडली. हे सर्व काळं धन 8 मोठ्या ट्रंकमध्ये लपवून ठेवलं होतं. पोलिसांनी जेव्हा एवढी सारी संपत्ती पाहिली तेव्हा त्यांचे डोळेच विस्फारले. अखेर हे सोनं चांदी मोजण्यासाठी एका मोठ्या ज्वेलरकडून त्यांना मशीनचं मागवावी लागली होती.

धक्कादायक बाब अशी की, मनोज कुमारकडे सोन्या चांदीसोबतच शस्त्रेही सापडली आहेत. यात तीन 9 एमएमची पिस्तूल, 18 छोटे बॉम्ब, एक एअर गन असं काही सापडलं आहे.

मनोज कुमारचे वडिल पोलीस कॉन्स्टेबल होते. मात्र नोकरीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर अनुकंपाखाली मुलाला ट्रेजरी विभागात 2006 मध्ये नोकरी मिळाली होती.

हा जो ट्रेजरी कर्मचारी होता, त्याचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. मात्र, नोकरीदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने मुलाला अनुकंपाखाली ट्रेझरी विभागात 2006 मध्ये नोकरी मिळाली होती.

डीएसपींनी याबाबत बोलताना सांगितलं की, “मनोज कुमारकडे 2.42 किलो सोनं, 84.10 किलो चांदी आणि 15.55 लाखांची रोख रक्कम सापडली आहे. याशिवाय त्याच्या नावावर 48 लाखांचं फिक्स डिपॉझिट, 27.05 लाखांचे बाँड देखील सापडले आहेत.”

मनोज कुमार याच्याकडून पोलिसांनी 2 चारचाकी, 7 टू व्हिलर आणि 4 ट्रक जप्त केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे दुचाकींमध्ये एक महागडी बाईकही आहे.